Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Nashik Crime News : माजी नगरसेवक शिवाजी चुंबळे यांच्या मुलासह तिघांविरोधात नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Nashik Crime News : दरोड्याच्या गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवल्याप्रकरणी माजी नगरसेवक शिवाजी चुंबळे (Shivaji Chumble) यांच्या मुलासह तिघांविरोधात नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Deolali Camp Police Station) ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यश गरुड या 28 वर्षीय तरुणाच्या विरोधात जबरी चोरी केली, अशी खोटी माहिती देऊन अडकवण्याचा प्रयत्न केला तसेच नाशिक शहरातील पवन पवार (Pawan Pawar) या राजकीय व्यक्तीचा कार्यकर्ता असल्याने तसेच दलित समाजाचा असल्याने त्याला मोठी शिक्षा व्हावी या हेतूने ही खोटी तक्रार देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले असून या प्रकरणी प्रताप शिवाजी चुंबळे (Pratap Chumble), सुनील शहा (Sunil Shah), रवींद्र जैन (Ravindra Jain) यांच्या विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत अधिक माहिती अशी की, यश सतीष गरुड (27, रा. कॅनल रोड) याच्या फिर्यादीनुसार तो उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) दाखल असलेल्या जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्यात अटक झाल्यानंतर 14 ऑगस्ट ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीत नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात (Nashikroad Central Jail) न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात 29 नोव्हेंबर 20024 रोजी प्रताप चुंभळे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित पवन पवार, विशाल पवार, रामेश्वर पटेल, युवराज मोरे, नाना पगारे व इतरांविरोधात दरोडा टाकून 1 लाख 70 हजार रुपयांची रोकड, सीसीटीव्हीचा डीव्हीआर, सीसीटीव्ही, टीव्ही असा एवज हिसकावून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल
दरोड्याची ही घटना 22 नोव्हेंबरला बेलतगव्हाण येथे घडल्याचे चुंभळे यांनी फिर्यादीत सांगितले. या गुन्ह्यात यश गरुड याचेही नाव आहे. मात्र तो घटनेच्या वेळी कारागृहात असल्याने त्याचा या गुन्ह्याचा संबंध नव्हता. तरीदेखील चुंभळे यांच्यासह मुंबईतील व्यावसायिक सुनील बबालाल शाह व रवींद्र चंपाशी जैन यांनी संगनमत करून दलित समाजावर अन्याय करून खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप गरुड याने केला आहे. त्यानुसार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात प्रताप चुंभळे, शाह व जैन विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या