search
×

PPF Scheme: पैशांची फुल्ल गॅरंटी! फक्त 500 रुपये गुंतवा अन् लखपती व्हा; सोबत टॅक्स सवलतही

PPF Scheme: पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजना सुरक्षित आणि चांगल्या परताव्यासाठी योग्य असल्याचं अनेकदा सिद्ध झालं आहे. तसेच, अनेक तज्ज्ञांनीही याला दुजोरा दिला आहे.

FOLLOW US: 
Share:

PPF Scheme: सरकारी योजनांपासून (Government Scheme) ते शेअर बाजारापर्यंत (Stock Market) अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून लाखो रुपये कमवू शकता. दरम्यान, जर तुम्हाला जोखीम मुक्त आणि कमी गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवायचा असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम सरकारी योजना आहे. तुम्ही या योजनेत 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि लाखो रुपये कमवू शकता. 

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजना सुरक्षित आणि चांगल्या परताव्यासाठी योग्य असल्याचं अनेकदा सिद्ध झालं आहे. तसेच, अनेक तज्ज्ञांनीही याला दुजोरा दिला आहे. पोस्ट ऑफिसपासून (Post Office) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ही योजना सुरू करता येईल. सध्या PPF अंतर्गत 7.1 टक्के व्याज दिलं जात आहे. या योजनेत दरमहा फक्त 500 रुपये गुंतवून तुम्ही सहजपणे कोट्यधीश होऊ शकता.

कमीत कमी कितीची गुंतवणूक करावी? 

जर तुम्हाला या योजनेअंतर्गत खातं उघडायचं असेल तर तुम्ही किमान 500 रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकता. कोणत्याही आर्थिक वर्षात तुम्हाला फक्त 500 रुपये गुंतवावे लागतील आणि तुम्ही जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. पीपीएफ खात्यातील मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा आहे आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मॅच्युरिटीनंतर संपूर्ण पैसे काढू शकता. मात्र, जर तुम्हाला पैशांची गरज नसेल तर तुम्ही ते आणखी 5 वर्ष वाढवू शकता. मॅच्युरिटी वाढवण्यासाठी तुम्हाला एक वर्ष अगोदर अर्ज करावा लागेल.

5 वर्ष पैसे काढणं अशक्य 

जर तुम्ही हे खातं सुरू केलं असेल आणि आणीबाणीच्या वेळी पाच वर्षांपूर्वी पैसे काढायचे असतील, तर ही रक्कम काढता येणार नाही, कारण या योजनेअंतर्गत पाच वर्षांचा लॉकइन कालावधी आहे. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही फॉर्म 2 भरून पैसे काढू शकता. या योजनेतून 15 वर्षांपूर्वी पैसे काढल्यास 1 टक्के व्याज कापलं जाईल.

टॅक्स सवलतीत 'या' योजनेचा समावेश 

PPF योजना EEE च्या श्रेणीत येते. याचाच अर्थ तुम्हाला योजनेअंतर्गत केलेल्या संपूर्ण गुंतवणुकीवर टॅक्स सवलतीचा (Income Tax) लाभ मिळतो. याशिवाय, तुम्हाला मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या व्याजावर कर सवलतीचा लाभही मिळतो. PPF अंतर्गत, आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर वार्षिक टॅक्स सूट मिळू शकते.

500 रुपयांच्या गुंतवणुकीवर लाखो रुपयांची कमाई

जर कोणी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अंतर्गत दरमहा 500 रुपये गुंतवले तर तुम्हाला 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. अशावेळी, तुम्हाला मॅच्युरिटीवर 1.63 लाख रुपये मिळतील. तर दरमहा एक हजार रुपये गुंतवणाऱ्या व्यक्तीला 15 वर्षांनंतर 3.25 लाख रुपये मिळतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Multibagger Share: टाटांचा 'हा' शेअर गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा सौदा; वर्षभरातच पैसे दुप्पट

Published at : 26 Dec 2023 12:59 PM (IST) Tags: post office Public Provident Fund PPF Stock Market Government Scheme

आणखी महत्वाच्या बातम्या

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

पगार येतो पण पैसा टिकत नाही, नेमकं काय करावं? 'हा' फॉर्म्युला वापरा, भरपूर पैसे मिळवा

पगार येतो पण पैसा टिकत नाही, नेमकं काय करावं? 'हा' फॉर्म्युला वापरा, भरपूर पैसे मिळवा

टॉप न्यूज़

Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...

''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक

''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक

मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत

मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत