एक्स्प्लोर
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
रेल्वे इंजिन गोंदिया येथील 'टॉवर वॅगन शेडमध्ये' जात असताना भिंतीला धडकल्याने भींत कोसळून इंजिन बाहेर आल्याची दुर्घटना घडली आहे.

Railway ingine accident in gondia
1/7

रेल्वे इंजिन गोंदिया येथील 'टॉवर वॅगन शेडमध्ये' जात असताना भिंतीला धडकल्याने भींत कोसळून इंजिन बाहेर आल्याची दुर्घटना घडली आहे.
2/7

अनियंत्रित इंजिनची भिंतीला धडक बसल्याने शेडची भिंत कोसळली, सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी नाही. मात्र, या घटनेचे फोटो व व्हिडिओ शेअर होत आहेत.
3/7

गोंदिया रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या टॉवर वॅगन शेडमध्ये रेल्वे इंजिन जात असताना तो अनियंत्रित झाल्याने समोरच्या भिंतीला धडकला.
4/7

भिंत कोसळली मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही, गोंदिया रेल्वेच्या इंजिन मेंटेनन्स टॉवर शेडमध्ये इंजिन जात असताना हा अपघात झाला
5/7

लोको पायलटने रेल्वे इंजिन 'टॉवर वॅगन शेडमध्ये'प्रवेश केला होता. त्यावेळी इंजिन थोडे पुढे गेल्याने भिंतीला धडकले. सुदैवाने या अपघातात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही
6/7

घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करुन पुढील कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, रेल्वे विभागात या अपघाताची जोरदार चर्चा रंगली.
7/7

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने इंजिन पाठीमागे घेत भींत बांधणीचे काम हाती घेतले जाईल, अशी माहिती दिली. तसेच, सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याने जीव भांड्यात पडला
Published at : 25 Feb 2025 06:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
