एक्स्प्लोर

Multibagger Share: टाटांचा 'हा' शेअर गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा सौदा; वर्षभरातच पैसे दुप्पट

टाटा समूहाच्या कंपनीनं 2023 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देणारी टाटांची कंपनी म्हणजे, ट्रेंट लिमिटेड शेअर (Trent Ltd Share).

Tata Group Multibagger Share: टाटा (TATA) आणि विश्वास, हे न तुटणारं समीकरण. देशातील प्रत्येकाच्या मनात टाटांनी अढळ स्थान निर्माण केलं आहे. घरातील मिठापासून ते अगदी गगनचुंबी इमारती उभारण्यापर्यंत टाटा (TATA Group) मोलाचं योगदान देतात. शेअर मार्केटमध्येही (Share Market) टाटांचा बोलबाला असल्याचं पाहायला मिळतं. गुंतवणूकदारांना मालामाल करताना टाटांचा कोणताच शेअर अजिबात मागेपुढे पाहत नाही. असाच एक टाटांच्या कंपनीचा शेअर Multibagger ठरला आहे. टाटा समूहाच्या कंपनीनं 2023 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देणारी टाटांची कंपनी म्हणजे, ट्रेंट लिमिटेड शेअर (Trent Ltd Share).

ट्रेंट लिमिटेड शेअर कंपनीत 5 लाख रुपये गुंतवणाऱ्या गुंतवणुकदारांची रक्कम केवळ एका वर्षात दुप्पट झाली आहे. म्हणजेच, जवळपास 10 लाखांपेक्षा जास्त. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, टाटांचा हा शेअर गेल्या दशकापासून त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा सौदा ठरला आहे. महत्त्वाची आणि सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, टाटांच्या या शेअरनं गुंतवणूकदारांना कधीही निराश केलेलं नाही. नेहमी तेजीतच राहिला आहे. 

या व्यवसायाशी संबंधित आहे कंपनी  

टाटा समूहाची कंपनी ट्रेंट लिमिटेड रिटेल, सौंदर्य आणि फॅशन उत्पादनांच्या व्यवसायाशी संबंधित आहे. या कंपनीच्या प्रमुख ब्रँडमध्ये Zudio आणि वेस्टसाइड यांचा समावेश आहे. त्यांची देशभरात 500 हून अधिक दुकानं आहेत. ज्या कंपन्यांचे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपये आहे, या यादीत टाटांच्या या कंपनीचा समावेश आहे. ट्रेंट एमकॅपनं गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी शुक्रवारी 1.05 लाख कोटी रुपयांची नोंद केली. कंपनीचा शेअर किंचित वाढीसह 29.68 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. 

कंपनीच्या शेअर्सचा परफॉर्मन्स 

टाटा समूहानं 1998 मध्ये ट्रेंट लिमिटेडची स्थापना केली आणि 10 वर्षांपूर्वी 13 डिसेंबर 2013 रोजी या कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त 101 रुपये होती, जी गेल्या शुक्रवारी वाढून 29680 रुपये झाली. गेल्या 5 वर्षात टाटांच्या या शेअरनं 72.25 टक्‍क्‍यांचा बक्कळ परतावा दिला आणि गुंतवणूकदारांच्या पदरात बक्कळ परतावा पडला. 28 डिसेंबर 2018 रोजी ट्रेंट शेअरची किंमत 361.40 रुपये होती.

2023 मध्ये गुंतवणूकदारांचे पैसे डबल 

यंदाच्या वर्षाबाबत बोलायचं झालं, तर 2023 मध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची रक्कम जवळपास दुप्पट झाल्याचं पाहायला मिळालं. या कालावधीत कंपनीनं गुंतवणूकदारांना 118.64 टक्क्यांचा मल्टिबॅगर रिटर्न दिला. गेल्या 26 डिसेंबर 2022 मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत 1357.50 रुपये होती, जी आता वाढून जवळपास दुप्पट झाली आहे. म्हणजेच, केवळ एकाच वर्षात प्रति शेअर मागे गुंतवणूकदारांना तब्बल 1610.50 रुपयांचा फायदा झाला आहे. 

तीन महिन्यात उत्तम परतावा 

शेयर बाजार (Stock Market) चढ-उतार आणि जोखमेची गुंतवणूक असलेल्या व्यवहार म्हटलं जातं. परंतु, यामध्ये अनेक असेही स्टॉक्स आहेत, जे आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत, याच स्टॉक्समध्ये सहभागी आहेत, Trent Ltd Stock. कंपनीच्या व्यवहारावर नजर टाकली तर, टाटांचा शेअर गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा सौदा ठरला आहे. गेल्या सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत ट्रेंटचा नेट प्रॉफिट वर्षाला 56 टक्क्यांनी वाढत असल्याचं पाहायला मिळालं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

SBI FD Scheme: SBI ची मस्त योजना; 400 दिवसांच्या गुंतवणुकीवर भरघोस व्याज, फक्त 7 दिवसच शिल्लक

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan Ranbir Kapoor Invested In Ayodhya: राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
15 वर्षांच्या SIP गुंतवणुकीवर 97 लाखांपर्यंतचा दमदार परतावा, 'या' 5 म्युच्युअल फंड्सची कमाल
Mutual Fund : 15 वर्षांच्या SIP गुंतवणुकीवर 97 लाखांपर्यंतचा दमदार परतावा, 'या' 5 म्युच्युअल फंड्सची कमाल
Financial Freedom : आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
EPFO e Sign Process : पीएफ खातेधारकांनो सावधान! ई-साईन' केली नाही तर पैसे अडकणार; जाणून घ्या सोपी ऑनलाईन पद्धत
पीएफ खातेधारकांनो सावधान! ई-साईन' केली नाही तर पैसे अडकणार; जाणून घ्या सोपी ऑनलाईन पद्धत

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
Embed widget