एक्स्प्लोर

स्वतःसाठी वेळच कुठे?

आज महिलांनी नोकरी करणं म्हणजे महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल वैगरे काही म्हणू नये. घर चालवण्यासाठी नवरा बायकोचं काम करत राहणं गरजेचं आहे. पण दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत तिचा संपूर्ण दिवस कामात, कामात आणि फक्त कामात जातो. हे काम घरातलं, ऑफिसमधलं आणि परत घरी परतल्यानंतर... गेला तिचा दिवस. तिच्याकडे तिच्यासाठी वेळ आहेच कुठे?

माझी आणि तिची ट्रेन पकडण्याची वेळ एकच. नेहमी ती आणि मी एकमेकींकडे पाहून हसतो. तोंडदेखीच ओळख. तिचा चेहरा नेहमीच हसरा. आज मात्र ती थोडी चिंतेत वाटली. तिचे डोळे भरुन आले होते. स्कार्फ बांधून तिचा अश्रू लपवण्याचा प्रयत्न होता. मात्र मी न राहून तिला विचारलं, तर ती मनमोकळेपणाने बोलू लागली. तिच्या लग्नाला 7 वर्ष उलटली. नवरा मल्टिनॅशनल कंपनीत कामाला. बँकेतली तिची नोकरी. सासू सासऱ्यांचं आजारपण, मोठे दीर, हाऊसवाईफ जाऊ, त्यांची 2 मुलं.. हे तिचं कुटुंब... हे तिचं कुटुंब यासाठी म्हटलं कारण आजही तिच्या कुटुंबात तिच्या माहेरच्यांना स्थान दिलं की अनेकांचे कान टवकारतात. नवरा दिवस रात्र कामात गुंतलेला.. ती तिच्या नोकरीत.. नवरा कधी घरी असला की त्याचं रहाटगाडं आरामात चालणार, मात्र तिला काही ब्रेक नाही. सुट्टीचा दिवस असला की घरातली आणखी 4 कामं निघणार. नवरा घरी म्हटलं की त्याच्या आवडीचं खाणंपिणं बनवणं आलं. सूनबाई आज घरी म्हटल्यावर 2 पक्वान्नं जास्त बनवा, अशी फर्माईश असणारच. शिवाय तिची आठवड्याची कामं उरकणं आलंच. रोज सकाळी उठून कामं आटोपून 10 वाजता ऑफिसला पोहोचणारी ती दुपार होऊन गेली तरी तिच्या आंघोळीचा पत्ता नाही. स्वतःसाठी वेळ द्यावा म्हटलं, थोडं बाहेर जावंसं म्हटलं की सुट्टीचा एक दिवस घरातल्यांसोबत घालवायला नको का? हा प्रश्न विचारला जाणार. तिच्यासाठी तिच्याकडे वेळ आहेच कुठे? चल जरा बागेत फिरुन येऊ, तिने नवऱ्याला सांगितलं की नवऱ्याचं उत्तर ठरलेलं मला ब्रेक मिळत नाही, मी थकतो. आज मला काहीही सांगू नकोस. मी फक्त आराम करणार. आरामाची व्याख्या फक्त नवऱ्यांपुरती? बायकोचा विचार का होत नाही? ती ही थकते. रोज थकते. नवरा उठायच्या आधी तिचा दिवस सुरु होतो. घरातल्यांची मनमर्जी राखत वागावं लागतं. सकाळचा नाश्ता घरच्यांच्या आवडीचा तोही वेळेत तिला उरकावा लागतो. नवरा ऑफिसला निघायच्या आधी त्याचा डब्बा तयार ठेवावा लागतो. सकाळी उठून 4 तास उलटलेले असतात तरी तिच्या पोटात काही गेलेलं नसतं. मग तिची ऑफिसला निघायची वेळ होते. पटापट उरकून नाश्त्याच्या नावाखाली दोन घास खाऊन घड्याळाच्या काट्यावर तिची धावपळ सुरु होते. 8.50 ची लोकल सुटली तर ऑफिसला पोहोचायला उशीर होणार. लेटमार्क नको. लोकलची गर्दी नेहमीचीच. त्यातूनही कसंबसं चढा, फर्स्ट क्लासचं तिकीट असूनही काहीही उपयोग नाही. गुरामेंढरांसारखाच प्रवास करावा लागतो. ऑफिसला पोहोचल्यावर थकवा जाणवू न देता आपण आज अगदी फ्रेश असल्याचा आव आणत काम करावं लागतं. जितकी शारीरिक दगदग त्यातूनही अधिक ती मानसिकरित्या थकते. पण, सांगणार कुणाला?  कारण ती फक्त बाईचं कर्तव्य पार पाडतेय. घरातलं तर तुला उरकावं लागणारच. तू नाही केलंस तर कोण करणार? ही बाईमाणसाची कामं आलीच पाहिजेत. नोकरी करुन थकतेस? सोड नोकरी. तुझ्या नोकरीवर मी काही अवलंबून नाही. मी तुला खायला घालू शकतो. मी सक्षम आहे... ही नवरे मंडळींच्या तोंडची भाषा ठरलेली. दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत तिचा संपूर्ण दिवस कामात, कामात आणि फक्त कामात जातो. हे काम घरातलं, ऑफिसमधलं आणि परत घरी परतल्यानंतर... गेला तिचा दिवस. तिच्याकडे तिच्यासाठी वेळ आहेच कुठे? काही जवळची माणसं सल्ले देतात.. नवऱ्यासोबत भांडायचं, जबरदस्तीने, हट्टाने त्याच्याकडे बाहेर फिरायला जाण्यासाठी तगादा लावायचा. पण, जिला साधं घरच्या कामातून मोकळीक मिळावी म्हणून सबब देता येत नाही, तिला नवऱ्यासोबत बाहेर जाण्यासाठी भांडता येईल? तिने तिच्यासाठी वेळ काढावा तरी कसा? याने तिचंच आयुष्य कमी नाही का होणार? तिने तिच्यासाठी जगावं तरी कधी? दोन पुस्तकं वाचायची म्हटलं की निवांत बसलेल्या सुनेकडे पाहून सासूला पोटशूळच उठतात. सूनबाई, घरी आहेस तर संध्याकाळी काही चमचमीत नाश्ता करावा की पुस्तक घेऊन बसावं? झालं, प्रश्नाचं सरबत्ती सुरु. जिची सुट्टीच्या दिवशी आंघोळच संध्याकाळी होते, तिने आणखी करावं तरी काय? त्यात रविवार सुट्टीचा दिवस म्हटलं की पाहुणे आलेच. मग झालं.. रात्री 12 काय नी 1 काय.. झोपेचं खोबरं झालेलं असणार आणि 5 तासाने पुन्हा आठवड्याचा पहिला दिवस सुरु होणार. लग्न झालेल्या महिलांमध्ये 100 पैकी 90 महिलांची तरी हिच व्यथा.. काही महिलांना NO म्हणता येतं, काहींना म्हणता येत नाही. ज्यांना NO म्हणता येत नाही त्यांची ही स्थिती. आज महिलांनी नोकरी करणं म्हणजे महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल वैगरे काही म्हणू नये. घर चालवण्यासाठी नवरा बायकोचं काम करत राहणं गरजेचं आहे. जेणेकरुन बचत, घराचं लोन, मुलांचा खर्च, मेडिकल खर्च निघत राहावा. गाडी के दोनों पैये चलते रहने चाहिए.. असं वक्तव्य आपण सर्रास ऐकतो. मात्र यात तिची ओढाताण होते, हे समजून कोण घेणार? ती काहीही न बोलता, घरासाठी आपलाही हातभार लागावा, नवऱ्यावर जास्त ताण पडू नये म्हणून स्वतःसाठी जगणंच विसरुन जाते. जेव्हा रिटायरमेंटची वेळ येते, तेव्हा तिला कळतं की स्वतःसाठी जगलोच नाही. चला आता रिटायरमेंटच्या पैशातला एका भाग वापरुन फिरुन येऊ. यातही फक्त ती नसते, तर ती, तिचा नवरा, मुलंही असतात. तिचं आयुष्य सर्वांसाठी मात्र तिचा स्वतःसाठी वेळच कुठे?
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: तुमच्या घरात सुनेला जाच होतो वाटतं; उद्धव ठाकरेंना खाष्ट सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना किशोरी पेडणेकरांनी सुनावलं
अमितच्या बायकोशी शर्मिला ठाकरे खाष्ट सासूप्रमाणे वागतात का? किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर बोचरा वार
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajingar Voting : छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाची तयारी पूर्णSanjay Raut Full PC  : राज हे मोदी, शाह, फडणवीस या राज्याच्या शत्रूंना मदत करतायत, संजय राऊतांचा आरोपAnil Deshmukh Nagpur : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक; 4 जणांवर गुन्हा दाखलTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  11 AM :19 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: तुमच्या घरात सुनेला जाच होतो वाटतं; उद्धव ठाकरेंना खाष्ट सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना किशोरी पेडणेकरांनी सुनावलं
अमितच्या बायकोशी शर्मिला ठाकरे खाष्ट सासूप्रमाणे वागतात का? किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर बोचरा वार
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Embed widget