Nagpur Rada Loss : नागपूर राड्याचं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करणार, फडणवीसांचा थेट इशारा
Nagpur Rada Loss : नागपूर राड्याचं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करणार, फडणवीसांचा थेट इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होमटाऊन असलेल्या नागपूर मध्ये कधी नवे तो मोठा हिंसाचार झाला आणि राज्यातल राजकारण ढवळून निघालं. फडणवीसांनी आज नागपूर मध्ये जाऊन दंगलखोरांना धडा शिकवण्याचा इशारा दिलाय. तर काँग्रेसच्या समितीनेही हिंसाचाराचा आढावा घेत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. नागपूर हिंसाचारात विरोधकांना मात्र वेगळाच संशय येतोय. पाहूया एक रिपोर्ट. आता जे काही नुकसान झालेल आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडन वसूल करण्यात येईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल. आता जर अशा प्रकारे दंगेखोरांना सरळ केलं नाही तर त्यांना अशी सवय पडेल म्हणून याच्यामध्ये कुठलाही टॉलरन्स हा पोलीस विभाग करणार नाही. तशाच प्रकारच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. हिंसाचारात झालेल्या नुकसानीची भरपाई दंगेखोरांकडूनच वसूल करण्यात येणार आहे. तसच ज्यांच नुकसान झाले त्यांनाही येत्या तीन ते चार दिवसात भरपाई मिळणार आहे. आता जे काही नुकसान झालेल आहे हे. हे सगळं नुकसान दंगेखोरांकडन वसूल करण्यात येईल, त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडन वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल. अशा प्रकारे नागपूर मध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत.























