विकासनिधी मिळत नाही, ठाकरे गटाच्या नेत्याचा आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा, शिंदे गटाचा हल्लाबोल
सरकारकडून परभणीला (Parbhni) विकास निधी मिळत नसल्यानं राजीनामा देण्याचा इशारा परभणीतील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल पाटील ( MLA Dr Rahul Patil ) यांनी दिला आहे.

MLA Dr Rahul Patil : सरकारकडून परभणीला (Parbhni) विकास निधी मिळत नसल्यानं राजीनामा देण्याचा इशारा परभणीतील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल पाटील ( MLA Dr Rahul Patil ) यांनी दिला आहे. ते अधिवेशनात बोलत होते. यावरुनच आता परभणीतील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने आमदार राहुल पाटील यांचा समाचार घेतला आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते आनंद भरोसे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राहुल पाटील तुम्ही राजीनामाच द्या, अशी मागणी केलीय.
त्यांनी राजीनामा द्यावाच परभणीचा विकास करायला आम्ही सक्षम
महायुती सरकारने 100 दिवसांच्या विकास आराखड्यात परभणीतील अनेक विकास कामे मंजूर केली आहेत. त्यामुळं सरकारला दोष न देता तुम्ही मागच्या 10 वर्षात एकही विकासकामे केली नाहीत. त्यामुळं इथल्या जनतेलाही विचारले तर तेही राजीनामा द्याच म्हणतील असे भरोसे म्हणाले. राहुल पाटील इथे ना विकासाच्या मुद्द्यावर ना कुठे कामे केली म्हणून निवडून आलेले नाहीत, तर 80 बुथवरील त्या लोकांच्या मतदानावर निवडून आले आहेत. त्यामुळं त्यांनी राजीनामा द्यावाच परभणीचा विकास करायला आम्ही सक्षम असल्याचे म्हणाले. त्यामुळं पुन्हा एकदा या दोन नेत्यांमध्ये चांगलेश शीतयुद्ध पेटण्याची शक्यता आहे.
परभणीला बंद नलिकेतून पाणी द्यावं, त्यामुळं बाण्याची बचत होईल
परभणीला बंद नलिकेतून पाणी दिले तर एक थेंबसुद्धा पाणी वाया जाणार नसल्याचे राहुल पाटील म्हणाले. पाण्याचा बचाव होईल. या कामाला प्रशासकीय मान्यता देणार का? मान्यात देणार नसला तर आम्ही राजीनामा देऊ का? असा सवाल राहुल पाटील यांनी उपस्थित केला होता.
विकास निधी मिळत नसल्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने
सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. याकाळात विकास निधी मिळत नसल्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने येत असल्याचं चित्र पाहायला मिळत नाही. विरोधी बाकावरील आमदारांना निधी मिळत नसल्याच्या तक्रारी आमदार करत आहेत. त्यामुळं अनेक ठिकाणी मतदारसंघाचील कामं रखडल्याचं बोललं जात आहे. परभणी विधानसभा मतदारसंघाचे देखील पाणीर रस्त्यांचे प्रश्न अपूर्ण आहेत. यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी त्यांची भूमिका मांडली. विरोधी आमदारांना निधी मिळत नसल्याचे पाटील म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानवर शिवसेना शिंदे गटाने टीका करत, राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
मुख्यमंत्र्यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली, त्यांच्याविरोधात हक्कभंग आणणार, बीड आणि परभणी प्रकरणावरुन नाना पटोलेंचा हल्लाबोल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

