KKR vs RCB IPL 2025 : रहाणे-नारायण हिट, रिंकू-रसेल फ्लॉप! RCB च्या फिरकीसमोर नाचले KKR, तुफानी सुरुवातनंतर शेवटच्या 10 षटकांत केल्या 67 धावा
आयपीएल 2025 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने हंगामाची सुरुवात चांगली केली आहे.

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru, 1st Match : आयपीएल 2025 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने हंगामाची सुरुवात चांगली केली आहे. त्याने पहिल्याच सामन्यात वादळी कामगिरी केली आणि या हंगामातील त्याचे पहिले अर्धशतकही झळकावले. रहाणेने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फक्त 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याने षटकार मारून हे केले. ज्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 174 धावा केल्या.
Innings Break!#RCB with a strong comeback after #KKR started well 👏👏
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2025
Who is winning the season opener - 💜 or ❤️
Chase on the other side ⌛️
Scorecard ▶ https://t.co/C9xIFpQDTn#TATAIPL | #KKRvRCB | @KKRiders | @RCBTweets pic.twitter.com/mu4Ws78ddA
एकेकाळी केकेआरचा स्कोअर 9.5 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 107 धावा होता. पण, रहाणे आणि नरेन बाद होताच, केकेआरचे फलंदाज काहीही करू शकले नाहीत. कोलकाताकडून कर्णधार रहाणेने सर्वाधिक 56 धावा केल्या. नरेनने 44 धावांची खेळी केली. आरसीबीकडून कृणाल पंड्याने सर्वाधिक तीन बळी घेतले. जोश हेझलवूडला दोन यश मिळाले.
First match as #KKR captain ✅
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2025
First fifty of the season ✅
Ajinkya Rahane continues to make merry 👌
Updates ▶ https://t.co/C9xIFpQDTn#TATAIPL | #KKRvRCB | @KKRiders pic.twitter.com/aeJUNEF9Bs
आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात केकेआर संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला. संघाकडून क्विंटन डी कॉक आणि सुनील नारायण यांनी डावाची सुरुवात केली. पण कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खूपच खराब झाली. सामन्याच्या पाचव्या चेंडूवर यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकला (4) जोश हेझलवूडने बाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे त्याच षटकात डी कॉकला जीवदान मिळाले, पण तो त्याचा फायदा घेता आला नाही.
पहिली विकेट पडल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि सुनील नारायण यांनी संघाची धुरा सांभाळली. दोघांनीही स्फोटक फलंदाजी केली, ज्यामुळे कोलकाताने पहिल्या सहा षटकांत 60 धावा केल्या. कर्णधार रहाणेची तुफानी फटकेबाजी सुरूच राहिली आणि त्याने फक्त 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान, सुनील नरेन देखील आक्रमक खेळताना दिसला. पण तो अर्धशतक पूर्ण करू शकला नाही.
सुनील नरेनने 26 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 44 धावा केल्या. नरेन आणि अजिंक्य रहाणे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 9.1 षटकांत 103 धावांची भागीदारी केली. नरेन बाद झाल्यानंतर कोलकाताने रहाणेची विकेट गमावली, जो कृणाल पंड्याचा बळी ठरला. रहाणेने 31 चेंडूत 56 धावा केल्या, यादरम्यान त्याने 4 षटकार आणि 6 चौकार मारले आणि आपल्या स्फोटक खेळीने कोलकाता चाहत्यांची मने जिंकली. त्यानंतर कृणालने व्यंकटेश अय्यर (6) आणि रिंकू सिंग (12) यांना स्वस्तात बाद केले. त्यानंतर फिरकी गोलंदाज सुयश शर्माने आंद्रे रसेलला बाद केले, जो फक्त 4 धावा करू शकला.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

