(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chanakya Niti : आयुष्यात कोणालाही फुकटचा सल्ला देण्याआधी चाणक्यांच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...
Chanakya Niti : भारतात फुकटचा सल्ला देणारे बरेच लोक असतात. पण, कोणाला कधी सल्ला द्यावा आणि कधी सल्ला देऊ नये? या संदर्भात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.
Chanakya Niti : असं म्हणतात की, भारतात फुकटचा सल्ला देणारे बरेच लोक असतात. पण, कोणाला कधी सल्ला द्यावा आणि कधी सल्ला देऊ नये? तसेच, कोणाला सल्ला दिल्याने आपलं नुकसान होऊ शकतं? या संदर्भात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यासाठीच आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ते जाणून घेणं गरजेचं आहे. अन्यथा, तुमचं नुकसान होऊ शकतं.
1. मूर्ख लोकांना सल्ला देऊ नका
आचार्य चाणक्य यांच्या मते सर्वात आधी मूर्ख लोकांना अजिबात सल्ला द्यायला जाऊ नका. कारण या लोकांना तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करताय हे कळत नाही यासाठी ते आयुष्यात त्याचा वापरही करता येत नाही. त्यामुळे असा लोकांना सल्ला देऊन तुम्ही फक्त तुमचा वेळ वाया घालवाल. यासाठीच अशा लोकांपासून दूर राहा.
2. लालची लोकांना सल्ले देऊ नका
आचार्य चाणक्य यांच्या मते लालची लोकांना विनाकारण सल्ले देऊ नका. मुळात त्यांना सल्ला दिल्याने तुमचे प्रयत्न व्यर्थ जातील. कारण हे लोक जेव्हा यांना एखादा हेतू साध्य करायचा असतो तेव्हाच हे लोक काम करतात. लालची लोक फार स्वार्थी देखील असतात. त्यामुळे यांना कधीही सल्ला द्यायला जाऊ नका. काही लोक तर तुमचे सल्ले ऐकून तुमचं नुकसानही करु शकतात.
3. वाईट लोकांना सल्ला देऊ नका
ज्या लोकांच्या रक्तातच समोरच्या व्यक्तीला दु:ख देणं, वाईट चिंतणे असतं अशा लोकांना चुकूनही सल्ले देऊ नका. कारण जर कोणी यांना सल्ला दिला तर त्याचा स्वार्थासाठी वापर करतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणंच शहाणपणाचं लक्षण आहे.
4. अहंकारी लोकांना सल्ला देऊ नका
आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार, अहंकारी लोकांना कधीच सल्ला देऊ नका.कारण अशा लोकांना फक्त आणि फक्त आपलं म्हणणं ऐकायला आणि ते सिद्ध करुन दाखवायला आवडतं. अशा लोकांमध्ये आपण फार यशस्वी आहोत असा समज असतो. त्यामुळे यांना दुसऱ्यांच्या गोष्टी फार क्षुल्लक वाटतात. अनेकदा हे लोक आपल्या अहंकारात येऊन जो आपल्याला सल्ला देतोय त्याच्यावरच चिडतात. त्यांचा अपमान करतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )