एक्स्प्लोर

Nashik Crime : बीडनंतर आता नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याची दादागिरी! दाम्पत्याला धमकी देत मागितली 50 लाखांची खंडणी; पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्... 

Nashik Crime : पंचवटीतील मखमलाबाद नाक्यावरील उदय कॉलनीत राहणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्याने एका दाम्पत्याला धमकी देत 50 लाखांची खंडणी मागितली होती.

Nashik Crime : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर (Santosh Deshmukh Murder Case) बीडचे संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे. त्यानंतर बीडमधील अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. आता नाशिकमधून (Nashik Crime News) देखील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पंचवटीतील मखमलाबाद नाक्यावरील उदय कॉलनीत  राहणाऱ्या भाजपा कामगार आघाडीचा सरचिटणीस रोहित कैलास कुंडलवाल (Rohit Kailas Kundalwal) याने वडिलांच्या मदतीने बेकायदेशिर सावकारी केल्याचे उघड झाले आहे. 

जुने नाशिक येथील व्यावसायिक दाम्पत्याकडून खासगी सावकारीतून अतिरिक्त व्याज वसूल करुन पन्नास लाखांची खंडणी मागून त्यांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन दोघांना ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. रोहित कैलास कुंडलवाल (34, रा. फ्लॅट-4, राधाकृष्ण बंगला, उदय कॉलनी, मखमलाबाद नाका, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. रोहितसह त्याच्या वडिलांविरुध्द भद्रकाली पोलिसांत खंडणीसह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा नोंद करुन रोहितला अटक करण्यात आली आहे.  

पन्नास लाखांची मागितली खंडणी 

याबाबत एका 40 वर्षीय कापड व्यावसायिक महिलेने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार रोहित व त्याचे वडील कैलास बाबुलाल कुंडलवाल (56) यांच्याविरुद्ध कार्यवाही सुरु झाली आहे. पीडित महिलेचे भद्रकाली पोलिसांच्या हद्दीतील हुंडीवाला लेन येथे कपडे विक्रीचे दुकान आहे. तिने व पतीने कपडे व्यवसाय थाटण्यासाठी कुंडलवाल यांच्याकडून व्याजाने पंधरा लाख रुपये घेतले. यानंतर, 2022 ते 12 मार्च 2025 या कालावधीत कुंडलवाल यांनी महिलेस दिलेल्या 15 लाख रुपयांच्या कर्जाच्या मोबदल्यात अवाजवी दराने तब्बल 38 लाख रुपये वसूल केले. त्यानंतर मुद्दल व व्याज धरुन पन्नास लाख रुपयांची मागणी केली. 

पिस्तूलाचा धाक दाखवत पैशांची मागणी

ही रक्कम न दिल्याने संशयिताने पीडितेस कॉलेज रोडवरील बिग तवा हॉटेल येथे बोलावून फोर्ड इंन्डेव्हर कारमध्ये जबरदस्तीने बसवून प्रसाद सर्कल जवळील जीममध्ये नेले. तेथे तिला लज्जा उत्पन्न होईल अशा शिव्या देऊन हातवारे केले. यानंतर, पीडितेसह तिच्या पतीस याने पंचवटीतील भक्तीधाम सिग्नलजवळ भेटण्यास बोलावून पिस्तूलाचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. यानंतर दुकानात येऊन रोहितने अवाजवी पैशांची मागणी करून पीडित महिलेच्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून जवळ ओढत अश्लिल कृत्य केले. त्यामुळे ‘पुढचे काय ते आता समजून घ्या’ अशी धमकी दिली. यानंतर रोहितसह त्याच्या वडिलांविरुध्द भद्रकाली पोलिसांत खंडणीसह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा नोंद करुन रोहितला अटक करण्यात आली आहे.  

संशयित भाजपचा पदाधिकारी 

दरम्यान, संशयित रोहित कुंडलवाल हा गेल्या आठ वर्षांपासून आरके फाऊंडेशन नावाने काम करतो. त्याचे मधुबन कॉलनीलगत संपर्क कार्यालय असून त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटसवर त्याने भाजपा कामगार आघाडी सरचिटणीस आणि भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी अशा नावाने पोस्ट, बॅनर अपलोड केले आहेत.  

आणखी वाचा 

Nashik Crime: मोबाईलमध्ये रेकॉर्डींग करून 25 वर्षीय तरूणानं उचललं टोकाचं पाऊल; नाशिकमधील 12 खासगी सावकारांवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2025: एकनाथ शिंदेंनी मोहरा निवडला, विधानपरिषदेवर कोणाला पाठवणार?
एकनाथ शिंदेंनी मोहरा निवडला, विधानपरिषदेवर कोणाला पाठवणार?
Harshvardhan Sapkal : देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबाइतकेच क्रूर शासक, त्यांना शिवरायांचा इतिहास पुसून टाकायचाय; काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबाइतकेच क्रूर शासक, त्यांना शिवरायांचा इतिहास पुसून टाकायचाय; काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
'त्यांनी' हुकूमशहा हिटलरच्या क्रुरतेच्या छळछावण्या, लाखोंच्या कत्तलीचे गॅस चेंबर अजूनही जपलेत!
'त्यांनी' हुकूमशहा हिटलरच्या क्रुरतेच्या छळछावण्या, लाखोंच्या कत्तलीचे गॅस चेंबर अजूनही जपलेत!
Rohit Sharma : गौतम गंभीर ठरवणार हिटमॅनचे भवितव्य? रोहितला कसोटी कर्णधारपदी कायम ठेवण्याबाबत BCCI मध्ये मदभेद? अहवालात खुलासा
गौतम गंभीर ठरवणार हिटमॅनचे भवितव्य? रोहितला कसोटी कर्णधारपदी कायम ठेवण्याबाबत BCCI मध्ये मदभेद? अहवालात खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 16 March 2025Sunita Williams & Wilmore To Return | सुनिता विल्यम्स आणि बूच विलमोर पृथ्वीवर परतणारABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 16 March 2025BJP Vidhan Parishad Candidate List : भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची नावं जाहीर, संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचेंना संधी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election 2025: एकनाथ शिंदेंनी मोहरा निवडला, विधानपरिषदेवर कोणाला पाठवणार?
एकनाथ शिंदेंनी मोहरा निवडला, विधानपरिषदेवर कोणाला पाठवणार?
Harshvardhan Sapkal : देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबाइतकेच क्रूर शासक, त्यांना शिवरायांचा इतिहास पुसून टाकायचाय; काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबाइतकेच क्रूर शासक, त्यांना शिवरायांचा इतिहास पुसून टाकायचाय; काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
'त्यांनी' हुकूमशहा हिटलरच्या क्रुरतेच्या छळछावण्या, लाखोंच्या कत्तलीचे गॅस चेंबर अजूनही जपलेत!
'त्यांनी' हुकूमशहा हिटलरच्या क्रुरतेच्या छळछावण्या, लाखोंच्या कत्तलीचे गॅस चेंबर अजूनही जपलेत!
Rohit Sharma : गौतम गंभीर ठरवणार हिटमॅनचे भवितव्य? रोहितला कसोटी कर्णधारपदी कायम ठेवण्याबाबत BCCI मध्ये मदभेद? अहवालात खुलासा
गौतम गंभीर ठरवणार हिटमॅनचे भवितव्य? रोहितला कसोटी कर्णधारपदी कायम ठेवण्याबाबत BCCI मध्ये मदभेद? अहवालात खुलासा
Building Collapse : अन् क्षणार्धात तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली, PHOTOS पाहून काळजाचा ठोका चुकेल
अन् क्षणार्धात तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली, PHOTOS पाहून काळजाचा ठोका चुकेल
Vidhan Parishad Election 2025 : नेत्यांची डोकेदुखी वाढली! विधानपरिषदेच्या एका जागेसाठी शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी, नाराजीनाट्य टाळण्यासाठी एकनाथ शिंदे ऐनवेळी नावाची घोषणा करणार?
नेत्यांची डोकेदुखी वाढली! विधानपरिषदेच्या एका जागेसाठी शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी, नाराजीनाट्य टाळण्यासाठी एकनाथ शिंदे ऐनवेळी नावाची घोषणा करणार?
Rajabhau Waje : नाशिकमधील ठाकरेंचे खासदार अचानक भाजप आमदार अन् पदाधिकाऱ्यांच्या भेटीला; नेमकं कारण काय?
नाशिकमधील ठाकरेंचे खासदार अचानक भाजप आमदार अन् पदाधिकाऱ्यांच्या भेटीला; नेमकं कारण काय?
Mumbai houing lottery: पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, 12 लाखात मुंबईत मिळणार घर
पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, 12 लाखात मुंबईत मिळणार घर
Embed widget