(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगी
Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगी
अदानी ग्रुपचे चेअरमन आणि देशातील दुसरे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या समोरील संकटात वाढ जाली आहे. अदानी समुहाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अमेरिकेतली एका न्यायालयानं अदानी ग्रुपच्या ग्रीन एनर्जी कंपनी सौर ऊर्जा क्षेत्रातील कंत्राट मिळण्यासाठी लाच दिल्याचा आणि फसवणूक केल्याच्या आरोपावरुन अटक वॉरंट गौतम अदानींसह इतरांना बजावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आज अदानी समुहांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर केनियानं देखील मोठा निर्णय घेत अदानी समुहाला धक्का दिला आहे. केनिया सरकारनं अदानी समुहासोबतचे विमानतळ विस्तार आणि पॉवर ट्रान्समिशनसंदर्भातील करार रद्द करण्याची घोषणा केली. जवळपास 6 हजार कोटींच्या प्रकल्पाचा करार रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. केनियाचे राष्ट्रपती विल्यम रुटो यांनी ही घोषणा केली आहे. अमेरिकेतील कोर्टानं अदानी ग्रुपच्या काही सदस्यांना अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिल्यानंतर केनियानं हा निर्णय घेतला. अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी गौतम अदानी यांच्यावर भारतातील सौर ऊर्जा प्रकल्पाची कंत्राटं मिळवण्यासाठी नियम अटीमध्ये अनुकूल ठरतील असे बदल करण्यासाठी 26.5 कोटी डॉलर म्हणजे 2200 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही माहिती समोर आल्यानंतर अदानी ग्रुपच्या सर्व शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.