Uddhav Thackeray: रूसू बाई रुसू , गावात जाऊन बसू, ठाकरेंनी शिंदेंना डिवचलंमुंबईतील शिवसेना मेळाव्यात स्वबळाचे संकेत दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. उद्धव ठाकरे आज राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीतून ते संपूर्ण राज्यातील आढावा घेणार आहेत. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात देखील उद्धव ठाकरे आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाने तयारीला सुरुवात केल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमाीवरउद्धव ठाकरे आज राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची बैठक घेणार आहेत. उद्धव ठाकरे या सर्वांना आज मार्गदर्शन करणार आहेत, तसेच पुढील रणनितीबाबत काही सूचना देखील करणार आहेत. दरम्यान, थोड्याच वेळात उद्धव ठाकरे या शिवसेना भवनात येणार आहे. ही बैठक सेना भवनात होणार आहे.