Accident : भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
Accident : घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, बोलेरो पिकअपमध्ये प्रवास करणारे सर्व लोक लग्नसमारंभात वेटर म्हणून कामावर जात होते. आयशर चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला.

Speeding Bolero pickup hits Eicher : अत्यंत भरधाव वेगाने जात असलेल्या बोलेरो पिकअपने आयशरला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. 11 जण जखमी झाले असून त्यापैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. धडक इतकी भीषण होती, की अपघातानंतर पिकअपमधील प्रवासी बाहेर फेकले गेले. त्यामुळे अनेकांचा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी पिकअपमध्ये २५ हून अधिक जण प्रवास करत होते. जखमींना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, धुक्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पंजाबमधील फिरोजपूर-फाजिल्का मार्गावरील मोहन गावाच्या उताडजवळ आज सकाळी हा अपघात झाला.
पिकअपचे नियंत्रण सुटले
याबाबत फिरोजपूरच्या डीसी दीपशिखा शर्मा यांनी सांगितले की, सर्व जखमींवर जिल्हा प्रशासनाकडून उपचार सुरू आहेत. त्यांची पूर्ण काळजी घेतली जाईल. तपासासाठी घटनास्थळी पोहोचलेले इन्स्पेक्टर जसविंदर सिंग ब्रार म्हणाले की, घटनेची माहिती मिळताच रोड सेफ्टी फोर्स (एसएसएफ) टीम घटनास्थळी पोहोचली होती. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर राष्ट्रीय महामार्ग रिकामा करण्यात आला. कारण पाठीमागे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. निरीक्षक ब्रार यांनी सांगितले की, बोलेरो पिकअपमध्ये मजूर प्रवास करत होते. ते फिरोजपूरहून ग्रामीण भागाकडे जात होते. यादरम्यान पिकअपचे नियंत्रण सुटले, त्यामुळे मागून येणाऱ्या आयशरला धडक बसून अपघात झाला. 8 हून अधिक जणांना रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गावकऱ्याने सांगितले, आयशरचालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला
त्याचवेळी, घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, बोलेरो पिकअपमध्ये प्रवास करणारे सर्व लोक लग्नसमारंभात वेटर म्हणून कामावर जात होते. आज सुफेवाला गावातील सुमारे 10 तरुण या पिकअपमधून वेटरच्या कामासाठी जात होते. यापैकी कोणाचा मृत्यू झाला आणि कोणाचा जीव वाचला? ही माहिती मिळू शकली नाही. आयशर चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला.
कामाच्या दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला
मृतांपैकी एकाच्या नातेवाईकाने सांगितले की, या अपघातात माझा पुतण्या जसवंत सिंह सत्तूचा मृत्यू झाला आहे. आज त्याच्या कामाचा दुसरा दिवस होता. तो कालच कामाला लागला होता आणि आजच त्याचा मृत्यू झाला. अपघात होताच आजूबाजूच्या गावातील लोक घटनास्थळी जमा झाले होते. यानंतर पोलिसांसह सर्व ग्रामस्थांनी बचावकार्य सुरू केले. हा अपघात एवढा भीषण होता की, पिकअपवरील तरुणांचे मृतदेह महामार्गाच्या कडेला असलेल्या शेतातही पडले होते.
डीएसपी म्हणाले, आयशर आणि पिकअपची थेट टक्कर झाली
याबाबत डीएसपी सतनाम सिंह यांनी सांगितले की, बोलेरो पिकअप गाडी गुरु हर सहाय येथून जलालाबादकडे जात होती. बोलेरोमध्ये मजूर प्रवास करत होते. त्याचवेळी जलालाबादहून फिरोजपूरच्या दिशेने कॅन्टर जात होता. शहीद उधम सिंग कॉलेजजवळ पोहोचल्यावर अचानक दोघांमध्ये थेट टक्कर झाली. पिकअपचे मोठे नुकसान झाले असून पिकअपमधील सर्व लोक अपघातस्थळापासून दूरवर फेकले गेले. जखमींना 108 रुग्णवाहिकेतून विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमचे सर्व पथक घटनास्थळी पोहोचले असून कारवाई सुरू केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
