Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Nitesh Rane : इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.

Nitesh Rane : इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्याकडे केली आहे. त्यासंबंधी त्यांनी अधिकृत पत्र दादा भुसे यांना दिले आहे. आता प्रकरणावरून राज्यात पुन्हा एकदा वादंग होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच मुस्लीम विद्यार्थिनींनी नितेश राणे यांना ओपन चॅलेंज दिले आहे. मंत्री नितेश राणे यांनी विवादित वक्तव्ये टाळावीत, असे विद्यार्थिनींनी म्हटले आहे.
बुरखा हा आमच्या धर्माचा विषय आहे, आस्थेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही बुरखा घालूनच परीक्षा देणार असल्याची प्रतिक्रिया नाशिकच्या नांदगाव येथील एच. आर. हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या मुस्लीम विद्यार्थिनींनी दिली आहे. जेव्हा परीक्षा सुरू असतात त्यावेळी आमची तपासणी देखील होत असते. मंत्री राणे हे जाणून बुजून एका विशिष्ट समाजाला टार्गेट करत असल्याची प्रतिक्रिया . आम्ही शिक्षण मंत्र्यांना विनंती करतो, की असे वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या विद्यार्थिनींनी शालेय राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
भिवंडीतील विद्यार्थिनींचाही विरोध
भिवंडीतील विद्यार्थ्यांनीही नितेश राणेंच्या मागणीला विरोध दर्शवला आहे. भिवंडीतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, धर्म आणि शिक्षण हा वेगळा भाग आहे. त्याला शिक्षणाशी जोडले जावू नये. शिवाय शासनाने शिक्षणावर भर दिला पाहिजे. ड्रेसवर, हिजाबवर आणि बुरख्यावर जोर देऊन काही होणार नाही. ज्यांना कॉपी करायची आहे ते कसेही कॉपी करतील. भारतात सर्वधर्म समभाव आहे आणि सर्वांना समान अधिकार आहे. त्यामुळे आम्ही ज्या कपड्यात कम्फर्टेबल आहे, त्याच कपड्यांमध्ये आम्ही परीक्षा देऊ शकतो, असे म्हणत नितेश राणे यांच्या मागणीला विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला आहे.
नितेश राणे यांची मागणी काय?
दरम्यान, नितेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले की, माध्यमिक शाळेत उच्च माध्यमिक शाळेत परीक्षेसाठी बुरखा घालून बसण्याची मान्यता दिल्याचं परिपत्रक आहे. असं लांगूलचालन चालणार नाही. बुरखा घालून परीक्षेला बसल्याचे इतरही धोके आहेत. याचे धोके लक्षात घेऊन हा निर्णय रद्द करावा. परीक्षेसोबतच मतदानाच्या वेळीही असे प्रकार उघडकीस आलेले आहेत. नेमके तेच विद्यार्थी परीक्षेला आहेत का? हे देखील पाहावं लागेल. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या मुलांनीही आपला धर्म शाळेत आणू नये. विशिष्ट धर्माचे लांगुलचालन होऊ नये ही सरकारची भूमिका आहे. सरकारचा भाग म्हणून मी बोलतोय. असं परिपत्रक काढलं असेल तर ते तात्काळ रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
