IPL 2022 Orange Cap : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत बटलरच अव्वल, केएल राहुल करु शकतो 'ओव्हरटेक'
IPL 2022 : आयपीएलचे लीग सामने संपले असून सध्यातरी ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सर्वाधिक धावा करत जोस बटलर पहिल्या स्थानावर आहे.
IPL 2022 Orange Cap : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेचे लीग सामने आता संपले असून मंगळवारपासून प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होईल. दरम्यान आतापर्यंत पार पडलेल्या 70 सामन्यांत सर्वाधिक धावा या राजस्थान रॉयल्सचा (RR) सलामीवीर फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) याच्या नावावर आहेत. त्यामुळे ऑरेंज कॅपही त्याच्याकडेच आहे. यंदाच्या हंगामात बटलरने 14 सामन्यांमध्ये 48.38 च्या फलंदाजीच्या सरासरीने आणि 146.96 च्या स्ट्राइक रेटने 629 धावा केल्या आहेत. दरम्यान या शर्यतीत जोसला लखनौचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) एका मोठ्या शतकी खेळीच्या जोरावर मागे टाकू शकतो. राहुलने 14 सामन्यात 537 धावा केल्या आहेत.
बटलरने यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून तुफान खेळी केली. मागील काही सामने त्याची बॅट शांत असली तर आतापर्यंत त्याने तीन शतकं आणि तीन अर्धशतकं झळकावत 629 धावा केल्या आहेत. त्यात आता राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये खेळणार असल्याने त्याच्याकडे आणखी धावा करण्याची संधी आहे.
यंदाच्या हंगामात टॉप कामगिरी करणारे फलंदाज
क्रमांक | फलंदाज | सामने | धावा | फलंदाजी अॅव्हरेज | स्ट्राईक रेट |
1 | जोस बटलर | 14 | 629 | 48.38 | 146.96 |
2 | केएल राहुल | 14 | 537 | 48.82 | 135.26 |
3 | क्विंटन डी कॉक | 14 | 502 | 38.62 | 149.40 |
4 | शिखर धवन | 14 | 460 | 38.33 | 122.66 |
5 | फाफ डु प्लेसिस | 14 | 443 | 34.08 | 130.67 |
हे देखील वाचा-