मोठी बातमी: उद्योगपती गौतमी अदानी रात्री अचानक फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीची चर्चा
Gautam Adani : अदानी उद्योग समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्योगपती गौतम अदानी हे मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानी दाखल झाले आहेत.

Gautam Adani meets Devendra Fadnavis : अदानी उद्योग समुहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautami Adani) यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्योगपती गौतम अदानी हे मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भेटीसाठी उद्योगपती अदानी सागर बंगल्यावर आल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी दोघांमध्ये चर्चा झाल्याची ही माहिती पुढे आली आहे. मात्र दोघांच्या भेटीमागचे कारण काय? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. काल (15 मार्च) रात्री उशिरा अदानी आणि फडणवीस यांची भेट झाली आहे. मात्र या मध्यरात्रीच्या भेटी मुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे.
मुंबईतील आणखी एका प्रोजेक्टवर अदानी समूहाची बाजी
धारावी पुनर्विकासाच्या निविदा प्रक्रियेत अदानी समुहाने बाजी मारली आहे. त्यानुसार अदानी समुहाकडून धारावीचा पुनर्विकास केला जात आहे. या पुनर्विकासाअंतर्गत सध्या धारावीतील बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यानंतर रहिवाशांची पात्रता निश्चिती केली जाणार आहे. लवकरच या प्रकल्पाला वेग दिला जाण्याची शक्यता आहे. अशा या पुनर्विकासासाठी महाराष्ट्र राज्य सरकार आणि अदानी समूह यांच्या संयुक्त भागीदारीने धारावी रिडेव्हपलमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड अर्थात डीआरपीपीएल नावाने कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीत अदानी समुहाचा 80 टक्के तर राज्य सरकारचा 20 टक्के हिस्सा आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला आता वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत धारावीतील 25 हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
अदानी समूहाकडून प्रकल्पासाठी सर्वाधिक 36 हजार कोटी रुपयांची बोली
अशातच धारावी पुनर्विकास प्रकल्पानंतर अदानी समूहाल मुंबईतील आणखी एक महत्त्वाचा प्रोजेक्ट मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रोजेक्ट जवळ जवळ 36000 कोटी रुपयांचा असल्याचे ही सांगितलं जातंय. मुंबईतील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी हा एक महत्त्वाचा प्रकल्प असल्याची ही माहिती आहे.
अदानी समूहाच्या अदानी प्रॉपर्टीज प्रा.लि. कंपनीला मुंबईतील मोतीलाल नगर I, II,III, गोरेगाव पश्चिम येथील 143 एकरमधील गृहनिर्माण प्रकल्पाच्या पुनर्विकासाचे काम मिळाले आहे. अदानी समूहाने या प्रकल्पासाठी सर्वाधिक 36000 कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यामुळे या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
