IPL Purple Cap 2022 : पर्पल कॅपसाठी चहल आणि हसरंगामध्येच शर्यत, इतर तीनही खेळाडूंचे आव्हान संपुष्टात
IPL Purple Cap 2022 : यंदाच्या हंगामात आतापर्यंत राजस्थान रॉयल्स संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या असून त्याच्याकडे पर्पल कॅप आहे.
![IPL Purple Cap 2022 : पर्पल कॅपसाठी चहल आणि हसरंगामध्येच शर्यत, इतर तीनही खेळाडूंचे आव्हान संपुष्टात IPL 2022 Latest Purple Cap lists in point table RRs Chahal having Purple cap IPL Purple Cap 2022 : पर्पल कॅपसाठी चहल आणि हसरंगामध्येच शर्यत, इतर तीनही खेळाडूंचे आव्हान संपुष्टात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/ea94ea25327f1b44234f2e08e3d6ef35_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Purple Cap 2022 : आयपीएलच्या (IPL 2022) यंदाच्या हंगामात राजस्थान संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) दमदार कामगिरी करत असून त्याने आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स नावावर केल्या आहेत. त्यामुळे पर्पल कॅपही त्याच्याकडेच आहे. दरम्यान पर्पल कॅपच्या या शर्यतीत काही खेळाडूंमध्ये सुरुवातीपासून चुरस दिसून येत होती. पण आता 10 पैकी 6 संघ स्पर्धेबाहेर गेल्याने या शर्यतीत युझवेंद्र आणि आरसीबीचा वानिंदू हसरंगा हे दोघेच जण आहेत. त्यामुळे आता या खेळाडूंमध्ये चुरशीची लढाई दिसून येणार आहे.
या शर्यतीत दिल्ली आणि हैदराबादचे काही गोलंदाज होते, पण दोन्ही संघाचे आव्हान संपल्याने आता हे खेळाडूही शर्यतीतून बाहेर गेले आहेत. कगिसो रबाडा (23 विकेट्स), उमरान मलिक (22 विकेट्स) आणि कुलदीप यादव (21 विकेट्स) हे खेळाडू या शर्यतीत होते. याशिवाय यादीत टॉपवर असणाऱ्या चहलने 14 सामने खेळत 26 विकेट्स टिपल्या आहेत. तर हसरंगा केवळ दोन विकेट्सने मागे असून त्याने 14 सामन्यात 24 विकेट्स घेतल्या आहेत.
यंदाच्या हंगामात टॉप कामगिरी करणारे गोलंदाज
क्रमांक | गोलंदाज | सामने | विकेट्स | गोलंदाजी अॅव्हरेज | इकनॉमी रेट |
1 | युझवेंद्र चहल | 14 | 26 | 16.53 | 7.67 |
2 | वानिंदु हसरंगा | 14 | 24 | 15.08 | 7.38 |
3 | कागिसो रबाडा | 13 | 23 | 17.65 | 8.45 |
4 | उमरान मलिक | 14 | 22 | 20.18 | 9.03 |
5 | कुलदीप यादव | 14 | 21 | 19.95 | 8.43 |
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)