एक्स्प्लोर

Harshvardhan Sapkal : देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबाइतकेच क्रूर शासक, त्यांना शिवरायांचा इतिहास पुसून टाकायचाय; काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis : औरंगजेब हा क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबच्या कबरीवरुन (Aurangzeb Kabar) राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. बजरंग दलाने (Bajrang Dal) ही कबर हटवण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे मिलिंद एकबोटे यांनी ही कबर नष्ट करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता सरकारने औरंगजेबच्या कबरीवर सुरक्षा वाढवली आहे. हे प्रकरण तापलेले असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. 

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, औरंगजेब हा क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत. ते धर्माचा आधार घेत आहेत. औरंगजेबाची कबर उचलून टाका, असं सांगत आहेत. याचा अर्थ त्यांना मराठी माणसांचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष आहे. क्रूर प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो, हे त्या ठिकाणी दिसून येते, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केलाय.

हर्षवर्धन सपकाळ शिवेंद्रराजेंना म्हणाले, तुम्ही राजीनामा द्या! 

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांना बदनाम करण्याचं षडयंत्र हे काँग्रेसच्या माध्यमातून चालू असल्याची टीका शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी केले आहे. काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याला महत्व दिलं नसल्याचही त्यांनी म्हटलं आहे. आता यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना प्रत्युत्तर दिले आहे. शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे, तुम्ही राजीनामा द्यावा, असे म्हणत त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. तर तुम्ही ज्या पक्षात राहिलेला आहात तो पक्ष शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधात आहे. तुम्ही या पक्षात राहू नये, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राची सद्भावना लयाला नेण्याचं काम भाजपने केलं

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपचे अनेक फेल्युअर आहेत. टोळ्या एकत्र येऊन स्थापन झालेले हे सरकार आहे. गँग ऑफ सरकार या सरकारमध्ये मान पानाचा खेळ आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आम्हाला महाविकास आघाडी करताना अडचणी आल्या. महाराष्ट्राची सद्भावना लयाला नेण्याचं काम भाजपने केलं.  खोक्या रिटर्न्स, नवीन खोक्या जन्माला आलाय.  या अगोदर पन्नास कोटी एकदम ओके, असं ऐकलं होतं.  कोकणातील सामाजिक स्वास्थ भाजपकडून बिघडवले जात आहे. कोकणातील नैसर्गिक साधन संपत्ती उद्योजकांना विकायची आहे.  उद्योगपतींना सांभाळण्याकरता कोकणातल्या सामान्य माणसाचा बळी देऊ नका, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या  

Anjali Damania: 'धनंजय मुंडेंना तिथल्या तिथे शरद पवारांनी धडा शिकवला असता तर...', अंजली दमानिया बीड प्रकरणावरून आक्रमक

Sanjay Raut: नरेंद्र मोदी जाताना देशाचे तुकडे करतील, भारताचा प्रवास 'हिंदू पाकिस्तान'च्या दिशेने; संजय राऊतांची खरमरीत टीका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'त्यांनी' हुकूमशहा हिटलरच्या क्रुरतेच्या छळछावण्या, लाखोंच्या कत्तलीचे गॅस चेंबर अजूनही जपलेत!
'त्यांनी' हुकूमशहा हिटलरच्या क्रुरतेच्या छळछावण्या, लाखोंच्या कत्तलीचे गॅस चेंबर अजूनही जपलेत!
Rohit Sharma : गौतम गंभीर ठरवणार हिटमॅनचे भवितव्य? रोहितला कसोटी कर्णधारपदी कायम ठेवण्याबाबत BCCI मध्ये मदभेद? अहवालात खुलासा
गौतम गंभीर ठरवणार हिटमॅनचे भवितव्य? रोहितला कसोटी कर्णधारपदी कायम ठेवण्याबाबत BCCI मध्ये मदभेद? अहवालात खुलासा
Building Collapse : अन् क्षणार्धात तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली, PHOTOS पाहून काळजाचा ठोका चुकेल
अन् क्षणार्धात तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली, PHOTOS पाहून काळजाचा ठोका चुकेल
Vidhan Parishad Election 2025 : नेत्यांची डोकेदुखी वाढली! विधानपरिषदेच्या एका जागेसाठी शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी, नाराजीनाट्य टाळण्यासाठी एकनाथ शिंदे ऐनवेळी नावाची घोषणा करणार?
नेत्यांची डोकेदुखी वाढली! विधानपरिषदेच्या एका जागेसाठी शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी, नाराजीनाट्य टाळण्यासाठी एकनाथ शिंदे ऐनवेळी नावाची घोषणा करणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 16 March 2025BJP Vidhan Parishad Candidate List : भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची नावं जाहीर, संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचेंना संधीSanjay Raut PC | देशात तणाव पसरवणं भाजपचं काम, मोहन भागवत हे सहन कसं करताय, राऊतांची रोखठोक भूमिकाABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 09 AM 16 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'त्यांनी' हुकूमशहा हिटलरच्या क्रुरतेच्या छळछावण्या, लाखोंच्या कत्तलीचे गॅस चेंबर अजूनही जपलेत!
'त्यांनी' हुकूमशहा हिटलरच्या क्रुरतेच्या छळछावण्या, लाखोंच्या कत्तलीचे गॅस चेंबर अजूनही जपलेत!
Rohit Sharma : गौतम गंभीर ठरवणार हिटमॅनचे भवितव्य? रोहितला कसोटी कर्णधारपदी कायम ठेवण्याबाबत BCCI मध्ये मदभेद? अहवालात खुलासा
गौतम गंभीर ठरवणार हिटमॅनचे भवितव्य? रोहितला कसोटी कर्णधारपदी कायम ठेवण्याबाबत BCCI मध्ये मदभेद? अहवालात खुलासा
Building Collapse : अन् क्षणार्धात तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली, PHOTOS पाहून काळजाचा ठोका चुकेल
अन् क्षणार्धात तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली, PHOTOS पाहून काळजाचा ठोका चुकेल
Vidhan Parishad Election 2025 : नेत्यांची डोकेदुखी वाढली! विधानपरिषदेच्या एका जागेसाठी शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी, नाराजीनाट्य टाळण्यासाठी एकनाथ शिंदे ऐनवेळी नावाची घोषणा करणार?
नेत्यांची डोकेदुखी वाढली! विधानपरिषदेच्या एका जागेसाठी शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी, नाराजीनाट्य टाळण्यासाठी एकनाथ शिंदे ऐनवेळी नावाची घोषणा करणार?
Rajabhau Waje : नाशिकमधील ठाकरेंचे खासदार अचानक भाजप आमदार अन् पदाधिकाऱ्यांच्या भेटीला; नेमकं कारण काय?
नाशिकमधील ठाकरेंचे खासदार अचानक भाजप आमदार अन् पदाधिकाऱ्यांच्या भेटीला; नेमकं कारण काय?
Mumbai houing lottery: पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, 12 लाखात मुंबईत मिळणार घर
पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, 12 लाखात मुंबईत मिळणार घर
Bhandara Accident News : एसटी बसनं महिलेला चिरडले; पती अन् दोन मुलांच्या डोळ्या देखत दुर्दैवी अंत, भंडारा शहर हादरलं! 
एसटी बसनं महिलेला चिरडले; पती अन् दोन मुलांच्या डोळ्या देखत दुर्दैवी अंत, भंडारा शहर हादरलं! 
Vidhan Parishad Election 2025: भाजपच्या विधानपरिषदेच्या 3 उमेदवारांची नावं ठरली; संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर आमदार होणार
माधव भंडारींचा पत्ता पुन्हा कट! भाजपची विधानपरिषदेच्या 3 उमेदवारांची नावं ठरली, कोणाकोणाला संधी?
Embed widget