एक्स्प्लोर
वर्धा बोगस बियाणे प्रकरण, 10 आरोपींना अटक
Wardha News : वर्धा बोगस बियाणे प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या घरात 28 लाखाची रोकड आढळली आहे.

Wardha bogus seed case
1/10

वर्धा बोगस बियाणे प्रकरणी (Wardha bogus seed case) दिवसेंदिवस नव नवीन खुलासे होत आहेत. आत्तापर्यंत १० आरोपींना अटक केली आहे.
2/10

वर्ध्याच्या म्हसाळा इथं सापडलेल्या बोगस कपाशी बियाणे रॅकेटमधील आरोपीच्या घरी मोठी रोकड सापडली आहे.
3/10

सेलू तालुक्याच्या रेहकी येथील आरोपी राजू जयस्वाल याच्या घरातून पोलिसांनी 28 लाख 20 हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे.
4/10

रेहकी येथील आरोपी राजू जयस्वाल याच्या घरातून जप्त करण्यात आलेली 28 लाख रुपयांची रोकड ही बोगस बियाणे विक्रीतून आली असल्याची माहिती मिळाली आहे.
5/10

या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये आणखी आरोपी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
6/10

आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या 10 आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
7/10

वर्धा (Wardha) जिल्ह्यातील म्हसाळा इथं कोट्यवधी रुपयांच्या बोगस बियाणे (Bogus seed) निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पोलीस आणि कृषी विभागाने पर्दाफाश केला आहे.
8/10

या बनावट बियाणे विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी तपास लावला आहे.
9/10

याप्रकरणात सेवाग्राम पोलिसांनी 15 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन आठ आरोपींना अटक केली होती. याच प्रकरणात पुन्हा दोघांना अटक करण्यात आल्याने अटक आरोपीची संख्या दहावर पोहोचली आहे.
10/10

या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने वर्धा जिल्ह्याच्या हमदापुर येथून एका पशुवैद्यकीय डॉक्टरलाही अटक केली आहे.
Published at : 16 Jun 2023 11:47 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
