एक्स्प्लोर
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
Pandharpur Mandir Online Booking : पहिल्याच दिवशी काही तासातच विठ्ठल रुक्मिणीच्या बहुतांश ऑनलाइन पूजा बुक झाल्या असून त्यातून मंदिराला 75 लाख रुपये मिळाले आहेत.

Pandharpur Mandir Online Booking
Source : ABP Majha Digital
सोलापूर: विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजा नोंदणीस देशभरातील भाविकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं. पहिल्याच दिवशी काही तासातच श्री विठ्ठलाच्या नित्यपूजा आणि चंदनउटी पूजा नोंदणी फुल्ल झाली आहे. यातून मंदिराला जवळपास 75 लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, चंदनउटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. दि. 01 एप्रिल ते 31 जुलै, 2025 या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणीची सुरवात 25 मार्च रोजी सकाळी 11.00 पासून करण्यात आली होती. त्यास भाविकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून, पहिल्याच दिवशी काही तासातच श्री विठ्ठलाच्या नित्यपुजा आणि चंदनउटी पुजेची नांदणी पूर्ण झाल्याची माहिती मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
यापूर्वी पहिल्या टप्प्यात दि. 7 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2024 व दुसऱ्या टप्प्यात दि.1 जानेवारी ते 31 मार्च 2025 या कालावधीतील व आता तिस-या टप्प्यात दि. 01 एप्रिल ते 31 जुलै, 2025 या कालावधीतील श्रींच्या सर्व पूजा भाविकांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणीस उपलब्ध करून दिल्या होत्या. या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून आणि देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली आहे.
त्यामध्ये श्री विठ्ठलाच्या नित्यपुजा व चंदनउटी पुजा फुल्ल झालेल्या आहेत. याशिवाय, रूक्मिणीमातेच्या नित्यपुजा व चंदनउटी पुजा अनुक्रमे 62 व 18 तसेच पाद्यपुजा 240 व तुळशी अर्चन पुजा 90 बुकींग झालेल्या आहेत. यामधून मंदिराच्या खजिन्यात जवळपास 75 लाख रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे .
उरलेल्या मोजक्या पूजांसाठी भाविकांना https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून पूजेची नोंदणी करता येईल. ऑनलाईन पध्दतीने पुजा उपलब्ध करून दिल्यामुळे भाविकांना घरबसल्या पुजा नोंदणी करता येऊ लागली आहे.
कसे असतील पूजांचे दर?
श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे रु.25,000/-, रू.11,000/- तसेच पाद्यपूजेसाठी रू.5,000/- व तुळशी अर्चन पूजेसाठी रू.2100/- तसेच श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेसाठी अनुक्रमे रु.21,000/-, रू.9,000/- इतके देणगी मुल्य आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. 1 एप्रिल ते 31 जुलै, 2025या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरवात 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजलेपासून ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे .
ही बातमी वाचा:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
शेत-शिवार
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
