Dhule: हृदयद्रावक! अंगणात बागडत होती, फुगा फुगवताना तोंडातच फुटला, 8 वर्षांच्या डिंपलचा श्वास कोंडून मृत्यू, धुळे हळहळले
फुगा फुगवताना तो तोंडातच फुटल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Dhule: अंगणात खेळत असताना फुगा फुगवताना 8 वर्षाच्या चिमुकलीचा दुदैर्वी मृत्यू झाल्याची घटना धुळ्यातील यशवंत नगर मध्ये घडलीय. फुगा फुगवताना तोंडातच तो फुटला आणि घशात त्या फुग्याचा तुकडा अडकल्याने तिचा श्वास कोंडला. श्वास घेण्यास त्रास होतोय हे लक्षात येताच घरच्यांनी तिला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी मुलीस तपासून मृत घोषीत केले. या घटनेमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. डिंपल मनोहर वानखेडे असं या मुलीचं नाव होतं. (Dhule) रबरी फुगा तोंडात फुटल्यानं त्या फुग्याचे तुकडे श्वासनलिकेत अडकल्याने आठ वर्षांच्या चिमूकलीला जीव गमवावा लागलाय.
घराच्या अंगणात बागडत होती, फुगा फुगवला अन्...
धुळे शहरातील यशवंत नगर, साक्री रोड येथे आपल्या घराच्या अंगणात फुगा फुगवत असताना तो अचानक फुटल्याने डिंपल मनोहर वानखेडे (वय 8) या चिमुकलीच्या घशात त्या फुग्याच्या तुकडा अडकल्याने तिला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला ही गोष्ट तिच्या घरच्यांना कळताच त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता तिला तातडीने आपल्या खाजगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र या दरम्यान डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले... अवघ्या आठ वर्षीय डिंपल आपल्या अंगणात खेळत असताना फुगा फुगवताना झालेल्या या दुर्घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. फुगा फुगवताना तो तोंडातच फुटल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
