एक्स्प्लोर
UPI अन् ATM वरुन पीएफचे पैसे काढता येणार, केव्हापासून नवे बदल लागू होणार? अपडेट समोर
PF Withdrawals via UPI and ATM : ईपीएफओकडून लवकरच यूपीआय आणि एटीएम कार्डवरुन पैसे काढण्याची सुविधा सुरु करण्यात येणार आहे.
UPI and ATM कार्डवरुन पैसे कधीपासून काढता येणार?
1/5

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओकडून लवकरच खातेदारांना यूपीआय अन् एटीएमद्वारे पीएफ रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.याचा फायदा कोट्यवधी खातेदारांना होणार आहे.
2/5

श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमित डावरा एएनआयला दिलेल्या माहितीनुसार मे किंवा जून मध्ये ही नवी सुविधा लागू करण्यात येईल.
3/5

ईपीएफओ येत्या काळात यूपीआयच्या माध्यमातून फंड काढण्यासंदर्भातील सुविधा देणार आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयानं एनपीसीआयच्या शिफारशींना मंजुरी दिली आहे. त्यामुळं यूपीआयच्या माध्यमातून पैसे स्वीकारण्याची किंवा काढण्याचा पर्याय उपलब्ध होईल.
4/5

डावरा यांनी दिलेल्या माहितीनुसार ईपीएफओ सदस्य तातडीनं 1 लाख रुपयांपर्यंतच रक्कम काढून त्यांच्या बँक खात्यात वर्ग करु शकतात. याशिवाय यूपीआयद्वारे पीएफ खात्यातील शिल्लक तपासली जाऊ शकेल.
5/5

ईपीएफओनं 120 हून अधिक डेटाबेसला इंटिग्रेट करुन प्रक्रिया डिजीटल करण्यात प्रगती केलीय. क्लेम प्रोसेसिंगचा वेळ कमी करुन 3 दिवसांवर आणला. पीएफ काढण्यसाठी 95 टक्के क्लेम ऑटोमेडेड आणि सोपी करण्यावर काम सुरु आहे. यामुळं डिसेंबर 2024 नंतर पीएफ खातेदारांना कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन काढता येईल.
Published at : 25 Mar 2025 11:55 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट


















