Astrology : आज वारुणी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृषभसह 'या' 5 राशींवर असणार भोलेनाथांची कृपा, लवकरच होणार धनलाभ
Astrology Panchang Yog 27 March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 27 March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 27 मार्च म्हणजेच गुरुवारचा दिवस आहे. आजचा दिवस दत्तगुरुंना समर्पित आहे. तसेच, आज शतभिषा नक्षत्रातून वारुणी योग (Yog) देखील जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. त्याचबरोबर या दिवशी प्रदोष व्रतसह शतभिषा नक्षत्राचा शुभ संयोग देखील जुळून आला आहे. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व फार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. तसेच, तुमच्या बुद्धीचा विकास झालेला असेल. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळालेला दिसेल. तसेच, धार्मिक कार्यात तुमचे मन रमेल. लवकरच धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येणार आहे. परदेशात जाण्याचा संधी निर्माण होतील.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला अप्रात्यक्षिकपणे धनलाभ होईल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार झालेला असेल. तसेच, हा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस फार अनुकूल असणार आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुख-समृद्धीचा असणार आहे. या काळात तुम्हाला भौतिक सुख-सुविधांचा चांगला लाभ घेता येईल. तसेच, प्रेम जीवनात चांगले बदल घडून येतील. जोडीदाराबरोबर तुमचे चांगले बदल दिसून येतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे. तसेच, सरकारी क्षेत्रातील योजनांचा तुम्हाला लाभ घेता येईल. तसेच, राजकीय क्षेत्रात तुमचं वर्चस्व टिकून राहील. एखादं रखडलेलं काम पूर्ण होईल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. तुमच्या बिझनेसमध्ये तुमची प्रगती दिसून येईल. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. आजच्या दिवसात सकारात्मक दृष्टीकोन पाहायला मिळेल. मुलांचं अभ्यासात मन रमेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















