एक्स्प्लोर
Wardha Accident: हिंगणघाट येथे महामार्गावर खड्डा चुकवताना ट्रॅव्हल्स पलटली; अपघातात एकाचा मृत्यू, आठ प्रवासी जखमी
Wardha Accident: वर्ध्याच्या हिंगणघाट येथील नागपूर - हैदराबाद महामार्गावर छोट्या आर्वी शिवारातील सगुणा कंपनीजवळ भरधाव ट्रॅव्हल्स पलटल्याने भीषण अपघात झाला आहे

Wardha Accident
1/9

पहाटे पाच वाजताच्या सुमारास रस्त्यावरील खड्डा चुकवताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स पलटी झाली.
2/9

या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे तर आठ जण यात जखमी झाले आहे.
3/9

ट्रॅव्हल्स क्रमांक सी बी 19 - एफ 3366 ही हैदराबाद येथून रायपूरला चालली होती.
4/9

ट्रॅव्हल्समधून 28 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
5/9

तर पन्नासच्यावर प्रवासी ट्रॅव्हल्समध्ये असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
6/9

ट्रॅव्हल्स भरधाव वेगात हैद्राबादवरून रायपूरकडे जात असताना हिंगणघाट नजीक पोहचली.
7/9

छोटी आर्वीजवळ महामार्गावर असलेल्या खड्डयांचा अंदाज चालकाला आला नाही. खड्डा चुकविताना चालकाचे ट्रॅव्हलवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅव्हल्स पलटी झाली. यात एक प्रवासी जागीच मृत्यू झाला.
8/9

गंभीर जखमी झालेल्याना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही किरकोळ जखमी दुसऱ्या बसमध्ये बसून पुढील प्रवासाला निघून गेले आहे.घटनास्थळी हिंगणघाट पोलीस पोहचले असून तपास सुरू आहे.
9/9

एसी कोच असलेल्या या ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याने प्रवासी क्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
Published at : 05 Oct 2023 08:42 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion