'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
मुजफ्फरनगर येथील दुकानाही एकावर एक मोफत दारु देण्यात येत आहे. त्यामुळे, येथील दुकानावर मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी गर्दी केली होती, ती गर्दी हटविण्यासाठी चक्क पोलिसांना पाचारण करण्यात आलं.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये दारु (Liquor) पिणाऱ्यांना समाधान व आनंद देणारी बातमी आहे. नोएडासह राज्यातील अनेक शहरांत दारुच्या एका बाटलीवर एक बाटली फ्री देण्यात येत आहे. त्यामुळे, दारु, वाईन शॉपवर तळीरामांची झुंबड उडाली असून काही दुकानांवर गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेल्याचं पाहायला मिळत आहे. प्रत्येक प्रकारच्या दारु बॉटलवर एक बॉटल मोफत देण्यात येत आहे. त्यामुळे, आपले काम-धंदे सोडून ग्राहकांनी दारु शॉपवर रांग लावली आहे. नोएडासह युपीतील हापुड जिल्ह्यातील या ऑफर्सची सध्या जोरदार चर्चा रंगली असून सोशल मीडियावरुन काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओत ग्राहका दारु घेताना चक्क बॉक्स भरुन नेत असल्याचेही दिसून येत आहे.
मुजफ्फरनगर येथील दुकानाही एकावर एक मोफत दारु देण्यात येत आहे. त्यामुळे, येथील दुकानावर मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी गर्दी केली होती, ती गर्दी हटविण्यासाठी चक्क पोलिसांना पाचारण करण्यात आलं. शहरातील बहुतांश दारु दुकानावर अशा ऑफर्सचे बोर्ड लागले आहेत. मार्च एन्ड असल्याने 31 मार्चपर्यंत आपल्या दुकानातील जुना स्टॉक संपविण्यासाठी दारु दुकानावर असे ऑफर्सचे बोर्ड लागले असून दुकानदारांकडून एकावर एक दारु बॉटल मोफत दिली जात आहेत. त्यामुळे, ग्राहकांची मोठी गर्दी दारू दुकानासमोर होत असून खोके भरुन बाटल्या नेण्यातही काही ग्राहक उत्सुक असल्याचं दिसून येत आहे.
1 एप्रिलनंतर राज्यात नवं धोरण
उत्तर प्रदेशातील या दारु दुकानांवरील ऑफर्सचे कारण हे उत्पादन शुल्क आहे. युपीतील दारुच्या दुकानांना त्यांच्याकडील पूर्ण स्टॉक 31 मार्च 2025 पर्यंत संपवायचा आहे. कारण, राज्यात 1 एप्रिल 2025 पासून नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू करण्यात येत आहे. तसेच, 1 एप्रिलपासून ई-लॉटरीद्वारे अनेक नवीन दुकाने सुरू होणार आहेत. त्यामुळेच, दारु विक्रेत्यांकडून एका बाटलीवर एक बाटली मोफत देण्याची ऑफर सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी, दुकानाबाहेर रांगाच रांगा लागल्या आहेत.
हेही वाचा
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई























