चौकशीवेळी प्रशांत कोरटकरच्या छातीत अचानक दुखू लागलं, पोलिसांच्या तातडीने हालचाली, कोल्हापुरात नक्की काय घडलं?
वैद्यकीय तपासणी करून त्याला चौकशीसाठी इतर ठिकाणी हलवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. याबाबत कोल्हापूर पोलीसांनी प्रचंड गोपनीयता ठेवली कोरटकरला नक्की कुठे हलवण्यात आले हे समजू शकले नाही.

kolhapur: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या तब्बल महिनाभरानंतर कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आणि तेलंगणातून 24 मार्च रोजी अटक केली. . मात्र, कोल्हापूर कोठडीत मध्यरात्री प्रशांत कोरटकरच्या छातीत कळा आल्याने कोल्हापूर पोलिसांनी तातडीने हलचाली करत कोरटकरची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणी करून त्याला चौकशीसाठी इतर ठिकाणी हलवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. कोरटकरला तपासाच्या कारणास्तव पोलीस प्रशांत कोरटकरला दुसरीकडे घेऊन गेल्याचे समजत असून रात्रभर चौकशी केल्यानंतर पहाटे पाच वाजता नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत कोल्हापूर पोलीसांनी प्रचंड गोपनीयता ठेवली कोरटकरला नक्की कुठे हलवण्यात आले हे समजू शकले नाही. प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरची रवानगी 28 मार्चपर्यंत राजारामपुरी पोलीस ठाण्यात केली होती. (Prashant Koratkar)
कोल्हापूरात नक्की घडले काय?
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरटकर हा 25 फेब्रुवारीपासून फरार होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत त्याने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. नागपुरातून फरार झालेला कोरटकर चंद्रपूरमध्ये लपून बसला होता. कोल्हापूर पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहून तो फरार झाला होता. त्यानंतर तो दुबईत पळून गेल्याचे वृत्तही माध्यमांमध्ये झळकले. मात्र महिनाभरानंतर प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात यश आलं. कोरटकरने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, जो अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी 18 मार्च रोजी फेटाळला होता.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, तपास जलद व्हावा म्हणून न्यायालयाने कोरटकरला पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले होते. मात्र आता कोरटकरला पोलीसांनी कोठडीतून दुसरीकडे पहाटे पाच वाजता हलवल्याचे वृत्त आहे. मध्यरात्री कोरटकरच्या छातीत दुखत असल्याने त्याला वैद्यकीय तपासासाठी हलवल्याची माहिती आहे.
न्यायालयात जोरदार युक्तिवाद
कोरटकरच्या अंतरिम जामिनावर 17 मार्च रोजी युक्तिवाद झाला होता. यावेळी इंद्रजित सावंत यांची बाजू वकील असीम सरोदे यांनी मांडली होती. सरकारी वकील विवेक शुक्ल यांनीदेखील जोरदार युक्तिवाद केला होता. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. गुन्हा दाखल होताच कोरकटर तो माझा आवाज नाही म्हणत फरार झाला, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तर आरोपी प्रशांत कोरटकर याची बाजू वकील सौरभ घाग यांनी मांडली.
हेही वाचा:

























