चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
छत्तीसगड राज्याच्या दंतेवाडा, बिजापूर क्षेत्रातील गीदम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गीरसापारा, नेलगोडा, बोडगा आणि इकेली जंगल परिसरात नक्षलवादी कॅम्प लागल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.

गडचिरोली : नक्षली कारवायांसाठी सातत्याने चर्चेत असेलल्या छत्तीसगडमधील बस्तरमध्ये काही दिवसांपूर्वीच दोन चकमकीत 30 नक्षलवाद्यांना (Naxal) ठार करण्यात आले होते. विजापूरमध्ये 20 आणि कांकेरमध्ये 10 नक्षलवादी ठार झाले होते. सुरक्षा रक्षकांकडून स्वयंचलित शस्त्रांसह या नक्षलवाद्यांचे सर्व मृतदेह जप्त करण्यात आले होते. आता, पुन्हा एकदा सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यात आली असून दंतेवाडा डीआरजी आणि बस्तर फायटर पथकाने 3 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. विशेष म्हणजे या कारवाईत नक्षल नेते सुधीर उर्फ मुरलीचा खात्मा झाल्याची माहिती आहे. नक्षलवादी मुरलीवर 25 लाख रुपयांचे बक्षीस होते, त्याला ठार करण्यात पोलिसांना (Police) यश आले आहे.
छत्तीसगड राज्याच्या दंतेवाडा, बिजापूर क्षेत्रातील गीदम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गीरसापारा, नेलगोडा, बोडगा आणि इकेली जंगल परिसरात नक्षलवादी कॅम्प लागल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे दंतेवाडा डीआरजी आणि बस्तर फायटरच्या टीमने अभियानावर असताना सकाळी 8 वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांवर कारवाईला सुरुवात केली. त्यावेळी, नक्षल आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत 25 लाख इनामी नक्षलनेता सुधीर उर्फ मुरली याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. तर, अन्य दोन नक्षलवाद्याची ओळख पटवली जात आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले असून आताही घटनास्थळावर सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे. चकमकी दरम्यान INSAS रायफल 303 रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. बस्तर क्षेत्रात 2025 मध्ये विविध चकमकीत 100 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे.
नक्षलवाद्यांचा खात्मा अन् आत्मसमर्पण
दरम्यान, काही दिवसांपूर्वी येथील कारवाईत 30 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. विजापूर-दंतेवाडा सीमेवरील नक्षलवाद्यांच्या मुख्य भागात सैन्याने प्रवेश करत नक्षलवाद्यांच्या मोठ्या टोळीला घेरले होते. या कारवाईत नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. तर, काही दिवसांपूर्वी 64 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. तेलंगणातील (Telangana) कोठागुडेम जिल्ह्यातील 64 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करत आपलं शस्त्र खाली ठेवलं. येथील पोलिस मुख्यालयात ऑपरेशन कार्यक्रमाचा भाग म्हणून मल्टी झोन-1 चे आयजीपी चंद्रशेखर रेड्डी यांच्यासमोर 64 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. विजापूर आणि सुकमा जिल्ह्यातील वेगवेगळ्या बटालियनमधील नक्षल सदस्यांनी आत्मसमर्पण केल्याने पोलीस व सरकारेच हे मोठे यश मानले जात आहेत.
हेही वाचा
अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला


















