एक्स्प्लोर
RBI :आरबीआयचा एचडीएफसी सह आणखी एका बँकेला दणका, लाखो रुपयांचा दंड ठोठावला, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं विविध नियमांचं पालन न केल्याप्रकरणी एचडीएफसीसह आणखी एका बँकेला दणका दिला आहे.
आरबीआयचा एचडीएफसी बँकेला दणका
1/5

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं केवायसी संदर्भातील सूचनांचं पालन न केल्यानं एचडीएफसी बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेवर मोठी कारवाई केली आहे.
2/5

आरबीआयनं एचडीएफसी बँकेला 75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर, पंजाब अँड सिंध बँकेला नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी 68.20 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
3/5

एचडीएफसी बँकेला बँकिंग विनियमन अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(आय)सह कलम 47ए (1) (सी) च्या तरतुदीनुसार दंड आकारण्यात आला आहे. 31 मार्च 2023 पर्यंत बँकेच्या आर्थिक स्थितीसंदर्भात बँकेच्या मूल्यांकनासाठी एक वैधानिक परिक्षण करण्यात आलं. एचडीएफसीच्या उत्तरानंतर आरबीआयनं आरोप योग्य असल्याचं म्हटलं.
4/5

एचडीएफसी बँकेनं त्यांच्याकडील माहितीनुसार आणि जोखीम संकल्पनेच्या आधारे लघू, मध्यम आणि उच्च जोखीम श्रेणीत वर्गीकृत केलं नाही. बँकेनं प्रत्येक ग्राहकाला विशिष्ट ओळख क्रमांक देण्याऐवजी ठराविक ग्राहकांना क्रमांक दिला.
5/5

पंजाब अँड सिंध बँकेवर नियमांचं पालन न केल्यानं 68.20 लाख रुपांचा दंड आखारण्यात आला आहे. बँकिंग विनियमन अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(आय), 51(1)सह कलम 47 ए (1) (सी) च्या तरतुदीनुसार दंड आकारण्यात आला आहे. आरबीआयनं याशिवाय केएलएम एक्सिवा फिनवेस्टला 10 लाखांचा दंड ठोठावला आहे.
Published at : 26 Mar 2025 10:39 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
राजकारण
व्यापार-उद्योग


















