UPI Down : अचानक यूपीआय डाऊन, गुगल पे, पेटीएम ते फोन पे सेवांमध्ये तांत्रिक अडचणी, यूजर्स हैराण
UPI News: यूनिफायईड पेमेंटस इंटरफेस म्हणजेच यूपीआयच्या सेवा आज सायंकाळी अचानक डाऊन झाल्याचं पाहायला मिळालं.

नवी दिल्ली : अनेक जण वस्तू खरेदी किंवा देवाण घेवाण करण्यासाठी ऑनलाईन पेमेंटसचा वापर करत आहेत.ऑनलाईन पेमेंटस अॅपवरुन पैसे पाठवण्याची प्रक्रिया अचानक डाऊन झाली होती. आज (26 मार्च) सायंकाळी यूपीआय सेवा डाऊन झाली. यामुळं मोठ्या संख्येनं वापरकर्त्यांना समस्या आल्या. अनेक यूजर्सना यामुळं अॅपवरुन पेमेंट करता येत नवह्तं. गुगल पे, फोन पे आणि पेटीएम यूजर्सला या अडचणींचा सामना करावा लागला. अचनाक समस्या निर्माण झाल्यानं यूजर्स त्रस्त झाले होते.
ऑनलाईन सेवा डाऊन झाल्यास त्यासंदर्भातील माहिती देणाऱ्या प्लॅटफॉर्म डाऊनडिटेक्टर नुसार आज सायंकाळी 7.50 वाजेपर्यंत यूपीआय संदर्भातील 2750 तक्रारी नोंदवल्या गेल्या. यामध्ये296 तक्रारी गुगल पे संदर्भातील होत्या. ज्यामध्ये पेमेंट, वेबसाईट अॅक्सेस आणि अॅप संदर्भातील तक्रारी होत्या. गुगल पेसह तर पेमेंट अॅपला देखील समस्या येत असल्यानं यूजर्स त्रस्त झाले होते.
यूपीआय पेमेंट यंत्रणेला डाऊन टाईमला सामोरं जावं लागलं याचं कारण अनेक बँकांच्या सर्व्हरमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक समस्या हे होतं. यूपीआय आधारित पेमेंट अॅपवरुन पेमेंट होत नसल्यानं यूजर्स त्रस्त झाले. गुगल पे, फोन पे णि पेटीएमच्या व्यवहारांवर परिणाम झाला. अनेक सोशल मीडिया यूजर्सन या संदर्भातील तक्रारी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर पोस्ट केल्या.
अशावेळी नेमकं काय करावं?
यूपीआय सेवा वापरणाऱ्या आणि त्यामाध्यमातून फक्त ऑनलाईन पेमेंटवर अवलंबून असणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. यूपीआयच्या सेवांमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास वैकल्पिक म्हणजेच रोख रकमेचा वापर व्यवहारांसाठी करावा. याशिवाय तुम्ही बँका आणि किंवा पेमेंट सर्विहस प्रोवयडर्सला संपर्क करा. काही यूजर्सला ही समस्या केवळ त्यांनाच येत असल्याचं वाटल्यानं ते त्रस्त झाले होते.
UPI is down for the first time & it is already showing an impact.
— Sankrityayn 👨🏻🚒 (@yashcool771) March 26, 2025
Most of us already stopped carrying liquid cash & this downtime has created a do or die situation 😂
Elders were right about carrying cash 📷✅ pic.twitter.com/HKhF7ye9zl
इतर बातम्या :

























