Shani Yuti 2025 : तब्बल 30 वर्षांनी शनी-शुक्राची महायुती; 'या' 3 राशींचा 29 मार्चपासून सुवर्णकाळ होणार सुरु, जगतील राजासारखं जीवन
Shani Yuti 2025 : शनी-शुक्राची युती जवळपास 30 वर्षांनी मीन राशीत होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांचे चांगले दिवस सुरु होणार आहेत.

Shani Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) कर्मफळदाता म्हणून ओळखलं जातं. तर, शुक्र ग्रहाला सुख, वैभव, धन-संपत्ती आणि वैवाहिक जीवनाचा कारक ग्रह मानलं जातं. 29 मार्च रोजी शनी आणि शुक्राची युती जुळून येणार आहे. ही युती जवळपास 30 वर्षांनी मीन राशीत होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांचे चांगले दिवस सुरु होणार आहेत. या शुभ राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनीची युती फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या अकराव्या चरणात हा योग जुळून येणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही या कालावधीत सुरु करु शकता. प्रमोशनचे योग तुमच्यासाठी निर्माण होतील. या संधीचा तुम्ही लाभ घ्याल. तसेच, तुम्ही हाती घेतलेलं काम मनासारखं पूर्ण होईल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती झालेली पाहायला मिळेल. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कामांमध्ये चांगलं यश मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी चांगला सपोर्ट मिळेल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या चतुर्थ चरणात हा योग जुळून येणार आहे. त्यामुळे या काळात तुम्ही एखाद्या नवीन वस्तूंची खरेदी करु शकता. तसेच, धन-संपत्तीत चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. इतकंच नव्हे तर, शनीदेवाच्या कृपेने तुमच्या कार्यात कोणताच अडथळा येणार नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Astrology : आज वारुणी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृषभसह 'या' 5 राशींवर असणार भोलेनाथांची कृपा, लवकरच होणार धनलाभ




















