Sanjay Raut Kunal Kamra : कुणाल कामराकडून नवा व्हिडिओ शेअर, संजय राऊतांची तीन ओळींची नवी पोस्ट, म्हणाले...
Sanjay Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामरा संदर्भात आणखी एक पोस्ट केली आहे.

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं रविवारी म्हणजेच 23 ऑगस्टला दोन व्हिडिओ त्याच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केले होते. त्या व्हिडिओनंतर सुरु झालेला वाद अद्याप सुरु आहे. कुणाल कामराच्या व्हिडिओनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिवसैनिंकांनी मुंबईत जिथं या कार्यक्रमाचं चित्रीकरण झालं त्या स्टुडिओत तोडफोड केली. यानंतर कुणाल कामरानं सोशल मीडियावर माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आज कुणाल कामरानं आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात हम होंगे कंगाल असा उल्लेख आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पोस्ट केली आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत यांनी कुणाल कामराच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एक्स पोस्टला शेअर करत म्हटलं की हा तर आपल्यासारखा निघाला. हा सुद्धा झुकणार नाही.जय महाराष्ट्र! संजय राऊत यांनी यापूर्वी देखील कुणाल कामराच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. ते म्हणालेले की कुणाल कामरा एक नामांकित लेख आणि स्टँड अप कॉमेडियन आहे. कुणालनं महाराष्ट्राच्या राजकारणावर एक व्यंगात्कम गीत लिहिल्यानं शिंदे गँगला मिरची लागली. त्यांच्या लोकांनी कामराचा स्टुडिओ मोडून टाकला. देवेंद्रजी तुम्ही कमजोर गृहमंत्री आहात,असं संजय राऊत म्हणाले होते.
ये तो अपून जैसा निकला…
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 25, 2025
ये भी झुकेगा नही साला!!
जय महाराष्ट्र!@kunalkamra88 @mieknathshinde @Dev_Fadnavis @narendramodi @BJP4India
@ https://t.co/uApbUinHmc
कुणाल कामराच्या नव्या व्हिडिओत काय म्हटलं?
कुणाल कामरानं त्याच्या सोशल मीडिया खात्यांवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात त्यानं 23 मार्चच्या रात्री स्टुडिओ हॅबिटेट वर जो हल्ला झाला, त्यानंतर ची वक्तव्य सुरु आहेत, त्यावर एक व्हिडिओ पोस्ट केली आहे. त्यात कामरानं ह "हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल एक दिन" हे गीत वापरलं आहे. 23 मार्च आणि 24 मार्चला जे घडलं ते त्याची दृश्य कामरानं गाण्याच्या व्हिडिओत वापरली आहेत.
कुणाल कामराला मुंबई पोलिसांचं बोलावणं
मुंबई पोलिसांकडून कुणाल कामराला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, कुणाल कामरानं मुंबई पोलिसांना एक पत्र लिहिलं आहे. त्यात त्यानं पोलिसांसमोर हजर होण्यासाठी एका आठवड्याचा वेळ मागितला आहे. पोलिसांनी या प्रकरणी निर्णय घेतला नसल्याची माहिती आहे.
खार पोलिसांनी कुणाल कामराला समन्स पाठवले.चौकशीसाठी त्यांना तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आले आहे.मुंबई पोलिसांनी कुणालच्या घरी समन्स पाठवले होते जे कुणालच्या वडिलांना देण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंग्यात्मक कविता लिहिल्याबद्दल मिळालेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी कुणालविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. जो पुढील तपासासाठी खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी कुणाल कामराला व्हॉट्सअॅपद्वारे समन्स पाठवल्याची माहिती आहे.
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
