राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
Raj Babbar son Prateik changes his surname : राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...

Raj Babbar son Prateik changes his surname : अभिनेता-राजकारणी राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर याने अलीकडेच त्यांची दिवंगत आई स्मिता पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे आडनाव बदलून 'प्रतिक स्मिता पाटील' असे ठेवले आहे. त्याच्या या निर्णयामुळे प्रतीक आणि त्याचे वडील राज बब्बर यांच्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या या कृतीमुळे प्रतीक आणि त्याचे वडील राज बब्बर यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय, प्रतिकने आपल्या वडिलांचे नाव वगळून आपल्या दिवंगत आईचे आडनाव धारण करण्याचा आणि त्याचे नाव बदलून प्रतीक स्मिता पाटील ठेवण्याचा निर्णय घेतल्याने दोघांच्या वादात आणखीच भर पडली.
दरम्यान, प्रतीकने त्याची आई स्मिता पाटील यांच्या नाव आणि वारसा सांभाळण्यासाठी त्याच्या इच्छेवर जोर दिला आहे. याचा अर्थ त्याला त्याच्या वडिलांच्या प्रभावापासून दूर राहायचे आहे. या सगळ्या दरम्यान आता प्रतिकचा सावत्र भाऊ आर्य बब्बरने भावाच्या आडनाव बदलण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
आर्याने म्हणाला की, स्मिता ही त्याची आई आहे. त्याला कोणते आडनाव ठेवायचे आहे किंवा सोडायचे आहे हे प्रतीकवर अवलंबून आहे. नाव बदलल्याने ओळख बदलत नाही, अशी प्रतिक्रिया आर्यने दिली. त्याने नाव बदलून आर्य किंवा राजेश केले तरीही तो बब्बरच राहिल. नाव बदलले तरी स्वतःचे अस्तित्व आणि ओळख बदलत नाही.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आर्य बब्बर म्हणाला, "तुम्ही तुमचे नाव बदलू शकता, तुमचे अस्तित्व नाही. मी बब्बरच राहणार कारण माझे अस्तित्व तसेच आहे. तुम्ही ते कसे बदलू शकता."
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रतीकने खुलासा केला की त्याने त्याचे नाव बदलून 'प्रतिक स्मिता पाटील' केले आहे. प्रतिक म्हणाला, मला परिणामांची पर्वा नाही. हे नाव ऐकल्यावर मला कसं वाटतं याची काळजी मी घेतोय. मला माझी आई (स्मिता पाटील), तिचे नाव आणि तिचा वारसा यांच्याशी पूर्णपणे जोडले गेले पाहिजे. मी माझ्या आईसारखे बनण्याचा प्रयत्न करत आहे, माझ्या वडिलांसारखा नाही."
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या























