Sambhaji Bhide on Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला; संभाजी भिडेंचा दावा
Sambhaji Bhide in Sangli: संभाजी भिडे यांनी शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना फटकारले आहे. मी कोणाचं नाव घेत नाही, पण विधानसभेत नीचपणा करणारे देशद्रोही, संभाजी भिडे

सांगली: छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला. आपल्याकडील प्राध्यापक, शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत, असे मत शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी व्यक्त केले. छत्रपती शहाजी राजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे, या मताचे होते. मात्र त्यांना यश आले नाही. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी तो विचार पुढे आणला. राजकीय पक्ष, गट, संघटना मात्र स्वार्थासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून घेत आहेत, अशी टीका संभाजी भिडे (Bhide Guruji) यांनी केली. ते बुधवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Bhide Guruji in Sangli)
यावेळी संभाजी भिडे यांनी शहाजी राजांचा उल्लेख करत ते हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या मताचे होते, असे म्हटले. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी शहाजी राजांचा (Shahaji Raje) हिंदवी स्वराज्याचा विचार पुढे नेला. हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी बलिदान दिले, असे भिडे यांनी म्हटले. सध्या छत्रपती संभाजी महाराजांना (Chhatrapati Sambhaji Maharaj) श्रद्धांजली म्हणून बलिदान मास पाळण्यात येत आहे. शनिवारी सांगलीत (Sangli News) शिवाजी महाराज पुतळ्यापासून सकाळी साडेसात वाजता मूक पदयात्रा काढण्यात येणार आहे.
वाघ्या कुत्राचा रायगडावरील पुतळा आवश्यक, संभाजीराजे चुकीचं बोलतायत: संभाजी भिडे
रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या (Waghya Dog) पुतळ्यावरुन सध्या वाद सुरु आहे. याबाबत छत्रपती संभाजीराजे जे बोलत आहेत, ते 100 टक्के चूक आहे. वाघ्याची जी कथा सांगितली जाते, ती सत्य आहे. आज माणसे जेवढी एकनिष्ठ नसतात, तेवढी त्याकाळी कुत्री होती. हे दाखवण्यासाठी रायगडावर वाघ्या कुत्र्याचा पुतळा आवश्यक आहे. निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहणे गरजेचे आहे. त्याचे प्रतीक म्हणून वाघ्या कुत्र्याचा पुतळा रायगडावर राहिला पाहिजे. स्वार्थासाठी कशीही मतं बदलणाऱ्या माणसांना माझं मत पटणार नाही, असे संभाजी भिडे यांनी म्हटले. यावर आता छत्रपती संभाजीराजे काही बोलणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
कुणाल कामरावरुन विधानसभेत धुडगूस घालणारे नीX, ते सगळे देशद्रोही; संभाजी भिडेंचा संताप
छत्रपती संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
