Dmart Marathi Language Issue News | 'नाही येत मराठी..', परप्रांतीयांकडून माज, मनसैनिकांनी दाखवला 'मराठी' इंगा
Dmart Marathi Language Issue News | 'नाही येत मराठी..', परप्रांतीयांकडून माज, मनसैनिकांनी दाखवला 'मराठी' इंगा
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
मुंबई : केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही मराठी भाषेला आपल्याच राज्यात हाल सोसावे लागत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलण्यास परप्रांतीय व्यक्तींकडून नकार दिला जातोय. वरती हिंदी किंवा इतर भाषांमध्ये बोलण्यासाठी अरेरावीपणा केला जातो. याचा प्रत्यय आता वर्सोव्यातही आला आहे. मी मराठीत बोलणार नाही, हिंदीतच बोलणार. तुला काय करायचं ते कर असं डी मार्टच्या कर्मचाऱ्याने म्हटलं. पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी फटकवल्यानंतर मात्र त्यांचा माज उतरला.
मुंबईतील एअरटेल गॅलरीतील एका हिंदी तरुणीने या आधी माज दाखवला होता. त्यानंतर आता मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा येथील डी मार्ट मधील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये देखील मराठीच्या मुद्द्यावरून वाद झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. डी मार्ट कर्मचाऱ्याकडून ग्राहकाला मी मराठी बोलणार नाही, हिंदीतच बोलणार असे म्हटल्याने वाद झाला. तसेच तुला काय करायचं ते कर असंही त्या मराठी व्यक्तीला अरेरावीपणे म्हटलं गेलं.
त्याचा व्हिडीओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर वर्सोव्याचे मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी डी मार्टमध्ये जाऊन त्या तरुणाला चांगलाच धडा शिकवला.
सुरुवातीला मनसेचे कार्यकर्त्यांनी त्या हिंदी कर्मचाऱ्यांना सरळ भाषेत समजवण्याचा प्रयत्न केला. तरीही ते कर्मचारी माफी मागत नव्हते. नंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फटकवल्यानंतर मात्र त्यांनी माफी मागितली. या पुढे मराठी माणसाचा भाषेवरून अपमान करणार नाही, जी गोष्ट घडली त्याबद्दल माफी मागतो असं ते हिंदी कर्मचारी म्हणाले.























