एक्स्प्लोर
Advertisement

Nanded News : नांदेडमध्ये गाईचे अनोखे डोहाळे जेवण , पंचक्रोशीत चर्चा
Nanded News : नांदेडमधील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या गाईच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम ठेवला.

Nanded News
1/10

या अनोख्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमामध्ये नातेवाईक, पाहुणे आणि गावकऱ्यांचा पाहुणचार करण्यात आला.
2/10

नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील बाभळी येथील शेतकरी चांदराव नरवाडे यांना पशू पालनाची आवड आहे.
3/10

यांनीच आपल्या गाईचे डोहाळे जेवण केले.
4/10

तिच्या डोहाळजेवणाआधी गाईला सजवण्यात देखील आले होते.
5/10

तिची खणा नाराळलाने ओटी भरण्यात आली.
6/10

तिची शिंगे रंगवली गेली, गोंडे, गळ्यात घुंगुरमाळा, पायात तोडे घातले गेले.
7/10

गाईचे डोहाळे जेवण शेतकऱ्याने एखाद्या लग्नासारखे केले.
8/10

लोकांच्या पगंती बसल्या, गाईला पंचारतीने ओवाळण्यात आले.
9/10

महिलांनी तिला गोग्रास भरवला आणि ओटी भरली.
10/10

सध्या संपूर्ण शहरात या अनोख्या डोहाळजेवणाची चर्चा सुरु आहे.
Published at : 20 Oct 2023 05:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बॉलीवूड
शेत-शिवार
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
