एक्स्प्लोर
Nanded : अभ्यास केलेले परीक्षेत आलंच नाही, मग विद्यार्थ्याने प्रत्येक उत्तरपत्रिकेला चिकटवल्या 500 च्या नोटा
Swami Ramanand Teerth Marathwada University : नांदेड विद्यापीठातील 2008 विद्यार्थ्यांपैकी 1720 विद्यार्थी कॉपी करताना सापडले. त्यांच्यावर एक वर्षाच्या बंदीची कारवाई करण्यात आली.

Swami Ramanand Teerth Marathwada University
1/10

अभ्यास केलेले काहीच परीक्षेत न आल्याने एका विद्यार्थ्याने त्याच्या सात उत्तरपत्रिकांमध्ये प्रत्येकी 500 च्या नोटा चिपकावल्या आणि पेपर जमा केल्याचं समोर आलं आहे.
2/10

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या उन्हाळी परीक्षेमध्ये कॉपी करताना सापडलेल्या 1720 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.
3/10

या विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थी असा होता की त्याला परीक्षेतील प्रश्नांचे उत्तर न आल्यानं त्याने प्रत्येक पेपरला 500 रुपये चिकटवून ते जमा केले.
4/10

नांदेड येथील मूल्यांकन केंद्रावर ही बाब परीक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या सातही उत्तरपत्रिका जशाच्या तशा सील करून विद्यापीठाकडे पाठवल्या.
5/10

या गैरवर्तणुकीचे प्रकरण महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 अन्वये विद्यापीठाच्या गठित 48 (5) (अ) समितीपुढे चौकशीसाठी ठेवण्यात आले होते. त्या विद्यार्थ्यावर चार परीक्षा बंदीची कारवाई करण्यात आली.
6/10

अभ्यास केलेला पण त्यामधील काहीच आलं नाही असं त्या विद्यार्थ्याने समितीपुढे सांगितलं. समितीने या गैरवर्तणुकप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित विद्यार्थ्यांची सर्व विषयांची संपादणूक रद्द करून त्यास पुढील एकूण चार परीक्षांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे.
7/10

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेत चार विद्याशाखांमधील चक्क 85.66 टक्के विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
8/10

लातूर जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर बनावट प्रवेश परीक्षा प्रमाणपत्र तयार करून महाविद्यालयातील दुसऱ्याच तोतया विद्यार्थ्याने परीक्षा दिली. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी ही बाब परीक्षा केंद्राच्या लक्षात आली.
9/10

चौकशीअंती दोघांनीही गुन्हा कबूल केला. याबाबत दोघांचीही उन्हाळी-2023 परीक्षेतील संपादणूक रद्द करून त्यांच्यावर पुढील चार परीक्षांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे.
10/10

कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या आदेशानुसार, चार विद्याशाखांमध्ये एकूण 1720 विद्यार्थ्यांवर सर्व संपादणूक रद्द (डब्ल्यूपीसी-होल परफॉर्मन्स कॅन्सल) अशी कडक शिक्षा करण्यात आली.
Published at : 08 Sep 2023 08:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion