एक्स्प्लोर

सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका

Saamana on Government : 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, असल्याची टीका सामना अग्रलेखातून सरकारवर करण्यात आली आहे.

Saamana on Ladki Bahin Yojana :  'सामना' अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका करण्यात आली आहे. 'हे सरकार एक नंबरचे खोटारडे आहे, लाडकी बहीण ते शेतकरी कर्जमाफीपर्यंत सरकराचे सर्व बुरखे फाटले' असल्याचं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. सामनातून सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. आधी सरकारमध्ये येण्यासाठी लाडकी बहिण आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीचा बागुलबुव दाखवला आणि सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना नवीन निकषांची कारणे देणारं सरकार खोटारडं असल्याची टीका यातून करण्यात आली आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या...

लाडकी बहीण ते शेतकरी कर्जमाफी; एक नंबरचे खोटारडे!

राज्याची आर्थिक स्थिती नीट नसणे, हे सरकार म्हणून तुमचे अपयश आहे. त्याचे खापर लाडक्या बहिणींवर का फोडत आहात? 'कॅग'नेही ताशेरे ओढले आहेत, ते तुमच्या आर्थिक धोरणांवरच. तेव्हा लाडक्या बहिणींच्या नावाने गळा काढत कर्जमाफी नाकारून शेतकऱ्यांचा गळा आवळण्याचे उद्योग थांबवा. लाडक्या बहिणींना नवीन निकषांचा, तर शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा बागुलबुवा दाखविणे बंद करा. घोषणांची जुमलेबाजी आणि ईव्हीएम घोटाळा करून तुम्ही सत्तेत आलात खरे, परंतु लाडक्या बहिणींपासून शेतकरी कर्जमाफीपर्यंतचे तुमचे सगळेच बुरखे काही महिन्यांतच फाटले आहेत. तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात, हे जनतेच्या लक्षात आले आहे. राज्यातील विद्यमान राज्यकर्त्यांचा बुरखा रोजच टराटरा फाटतो आहे. मग ते संतोष देशमुख हत्या प्रकरण असो, राज्यातील कायदा-सुव्यवस्था असो, लाडकी बहीण योजना असो, की शेतकरी कर्जमाफी. प्रत्येक बाबतीत राज्य सरकार रोजच उघडे-नागडे होत आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री 'तपास सुरू आहे', 'कोणालाही सोडणार नाही' हेच डमरू वाजवीत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही सर्व मंडळी राज्यातील तमाम 'लाडक्या बहिणीं'चे 'लाडके भाऊ' वगैरे झाले होते. या योजनेवरून त्यांनी स्वतःच स्वतःला पंचारती ओवाळून घेतल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत या मंडळींना जे यश मिळाले, त्यात मोठा वाटा याच लाडक्या बहिणींचा आहे, असे ते मोठ्या तोंडाने सांगत होते. मात्र, आता सत्तेत बसल्यावर यांच्या मोठ्या तोंडाचा चंबू झाला आहे आणि लाडक्या बहिणींना 'निकषां'च्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग त्यांनी सुरू झाले केले आहेत. या चाळणीतून सुमारे 50 लाख 'लाडक्या' बहिणी 'नावडत्या' होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच निकषांत न बसणाऱ्या बहिणींना अपात्र ठरवून त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे परत सरकारजमा करण्याच्या 'सावकारी'ला सुरुवातदेखील झाली आहे. धुळे जिल्ह्यातील एका लाडक्या बहिणीला सरकारच्या या घूमजाव धोरणाचा फटका बसला आहे. तिला मिळालेले 7500 रुपये परत सरकारजमा करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी उफाळून आलेले सत्ताधाऱ्यांचे 'बंधूप्रेम' सत्तेत बसताच, असे आटत चालले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरूनही या मंडळींनी घूमजाव केले आहे. खुद्द राज्याच्या कृषी मंत्र्यांनीच लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर 'ताण' पडत असल्याने शेतकऱ्यांनी कर्जमाफी विसरावी, असे जाहीर करून हात वर केले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणी, आशा सेविकांपासून शेतकऱ्यांपर्यंत घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पाडला होता. शेतकरी कर्जमाफी देणार म्हणजे देणारच, असा आव भाजपने जाहीरनाम्यात आणला होता. तुमचा तो आव आता कुठे गेला? शेतमालास हमीभाव देण्यापासून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यापर्यंत अनेक आश्वासने 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दिली होती, मात्र 11 वर्षांपूर्वी त्यासंदर्भात कानावर ठेवलेले हात मोदी सरकारने अजूनही काढलेले नाहीत. याच मागण्यांसाठी पंजाब-हरयाणा सीमेवर कित्येक दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे, पण त्याची दखल घेण्याचेही सौजन्य मोदी सरकारने दाखविलेले नाही. मोदी सरकारच्या महाराष्ट्रातील 'चेले-चपाटे' सरकारनेही राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफी देऊ, असे सांगायचे आणि सत्तेत बसल्यावर हात वर करायचे. राज्याची आर्थिक स्थिती नीट नसणे हे सरकार म्हणून तुमचे अपयश आहे. त्याचे खापर लाडक्या बहिणींवर का फोडत आहात?

'कॅग'नेही ताशेरे ओढले आहेत ते तुमच्या आर्थिक धोरणांवरच. तेव्हा लाडक्या बहिणींच्या नावाने गळा काढत कर्जमाफी नाकारून शेतकऱ्यांचा गळा आवळण्याचे उद्योग थांबवा। लाडक्या बहिणींना नवीन निकषांचा तर शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा बागुलबुवा दाखविणे बंद करा। घोषणांची जुमलेबाजी आणि ईव्हीएम घोटाळा करून तुम्ही सत्तेत आलात खरे, परंतु लाडक्या बहिणींपासून शेतकरी कर्जमाफीपर्यंतचे तुमचे सगळेच बुरखे काही महिन्यांतच फाटले आहेत. तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात, हे जनतेच्या लक्षात आले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

"त्याने अचानक माझ्या अंडरवेअरमध्ये हात टाकला", प्रसिद्ध अभिनेत्रीचा अनेकदा लैंगिक छळ, धक्कादायक खुलासा करत म्हणाली...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
Mumbai Crime: अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा करत खुणावलं, नागरिकांनी रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली
अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा केला, रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली, गुन्हा दाखल
Santosh Deshmukh Case: कोयता, 41 इंचाचा रॉड, फायटर अन्... संतोष देशमुखांच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम
रॉड, फायटरने बेदम मारुनही संतोष देशमुखांचा जीव जात नव्हता, हैवान आरोपींनी छातीवर उड्या मारल्या
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुंबईत CM फडणवीसांच्या भेटीला, काय चर्चा होणार? राज्याचं लक्ष
मोठी बातमी : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुंबईत CM फडणवीसांच्या भेटीला, काय चर्चा होणार? राज्याचं लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 07 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सTulja Bhavani Mandir Temple : तुळजाभवानीच्या गाभाऱ्याला पुरातन झळाळीABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 07 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सTop 70 at 7AM Superfast 07 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
Mumbai Crime: अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा करत खुणावलं, नागरिकांनी रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली
अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा केला, रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली, गुन्हा दाखल
Santosh Deshmukh Case: कोयता, 41 इंचाचा रॉड, फायटर अन्... संतोष देशमुखांच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम
रॉड, फायटरने बेदम मारुनही संतोष देशमुखांचा जीव जात नव्हता, हैवान आरोपींनी छातीवर उड्या मारल्या
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुंबईत CM फडणवीसांच्या भेटीला, काय चर्चा होणार? राज्याचं लक्ष
मोठी बातमी : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुंबईत CM फडणवीसांच्या भेटीला, काय चर्चा होणार? राज्याचं लक्ष
Sam Konstas Salary : विराटशी पंगा घेणाऱ्या 19 वर्षीच्या पोरांचा पगार कोटींनी वाढला! एका सामन्यासाठी घेणार इतके पैसे? वाचून थक्क व्हाल!
विराटशी पंगा घेणाऱ्या 19 वर्षीच्या पोरांचा पगार कोटींनी वाढला! एका सामन्यासाठी घेणार इतके पैसे? वाचून थक्क व्हाल!
मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान! देवीच्या शाकंभरी महोत्सवाला आजपासून सुरुवात
मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान! देवीच्या शाकंभरी महोत्सवाला आजपासून सुरुवात
गुरुद्वारामध्ये गायनाला सुरुवात, आठव्या वर्षी सोडलं घर, कोट्यवधींचा मालक असलेल्या 'या' गायकाला ओळखलं का?
गुरुद्वारामध्ये गायनाला सुरुवात, आठव्या वर्षी सोडलं घर, कोट्यवधींचा मालक असलेल्या 'या' गायकाला ओळखलं का?
युझी-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; दुसरीकडे चहल मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट, तोंड लपवून निघून गेला
युझी-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; दुसरीकडे चहल मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट, तोंड लपवून निघून गेला
Embed widget