एक्स्प्लोर

Dhananjay Munde: मी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिलेला नाही; धनंजय मुंडेंनी ठामपणे सगळंच सांगून टाकलं

Dhananjay Munde resign: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. संतोष देशमुख हत्याप्रकणावरुन वातावरण तापलं

मुंबई: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन कोंडीत सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत धनंजय मुंडे यांनी व्यथित होऊन मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या कालपासून ऐकायला मिळत आहेत. मात्र, धनंजय मुंडे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना, 'काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही', असे स्पष्टपणे सांगितले. यावेळी धनंजय मुंडे यांच्या देहबोलीत पुरेपूर आत्मविश्वास दिसत होता. संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड अडकले असले तरी धनंजय मुंडे यांच्यावर थेट कोणताही ठपक नाही. त्यामुळे एसआयटी आणि सीआयडीच्या चौकशीतून काही निष्पन्न होईपर्यंत धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याबाबत कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे अजितदादांनी तुर्तास धनंजय मुंडे यांना अभय दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा आत्मविश्वास अजूनही टिकून असल्याची चर्चा आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत आहे. या बैठकीसाठी मंगळवारी सकाळी धनंजय मुंडे हे मंत्रालयात आले होते. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या राजीनाम्याचे वृत्त स्पष्टपणे फेटाळून लावले. संतोष देशमुख हत्याप्रकरणात बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात एकटवले आहेत. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाची माहिती दिली होती. या सगळ्यामुळे अजित पवार यांच्यावर धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा घेण्यासाठीचा दबाव वाढला आहे. अजित पवार यांनी तुर्तास धनुभाऊंना अभय दिले असले तरी ते सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले होते. या सगळ्या घटनाक्रमानंतर धनंजय मुंडे यांचे बीडचे पालकमंत्रीपद जवळपास गेल्यात जमा आहे. मात्र, आता विरोधकांचा दबाव कायम राहिल्यास धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद तरी कायम राहणार की नाही, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहेत: सुरेश धस

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा ठपका असणारे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार पाठीशी घालत आहेत. अजितदादा आकांच्या आकाचा राजीनामा घेतील, असे वाटत नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या पुढच्या पिढीकडून हाव असलेले राजकारण करण्यात आले. त्यांनी सर्व प्रकल्पांमध्ये पैसा लुटण्याचे काम केले. एका रस्त्यावर तीन ते चार योजनांचे पैसे लाटले. गोपीनाथ मुंडे यांच्या 'माधव' या समीकरणातील मा आणि ध कुठे गेला? आता फक्त वंजारी राहिला आहे, तोदेखील फक्त पैसे आणून देणारा, अशी टिप्पणी सुरेश धस यांनी केली.

आणखी वाचा

कोयता, 41 इंचाचा रॉड, फायटर अन्... संतोष देशमुखांच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

टेलिप्रॉम्प्टर समोर केलेलं भाषण हे महिलांसाठी नव्हे तर सत्ता टिकवण्यासाठी, पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर प्रहार
टेलिप्रॉम्प्टर समोर केलेलं भाषण हे महिलांसाठी नव्हे तर सत्ता टिकवण्यासाठी, पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर प्रहार
Narendra Modi : 30 मिनिटांच्या भाषणात 60 वेळा काँग्रेसचं नाव, महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
30 मिनिटांच्या भाषणात 60 वेळा काँग्रेसचं नाव, महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
Narendra Modi : काँग्रेसने महिलांच्या अधिकाराची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार; नरेंद्र मोदींची टीका
ज्यांनी महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला त्यांना परिणाम भोगावे लागतील, त्यांनी महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला; नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Embed widget