Nashik News : लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
Nashik News : मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आई-वडिलांनी टोकाचे पाऊल उचलल्याने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Nashik News : दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या (Nashik Civil Hospital) आवारातील झाडाला गळफास घेत एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या पाठोपाठ आता नाशिकमध्ये (Nashik News) आणखी एक आत्महत्येची घटना घडली आहे. मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आई-वडिलांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. आताम्हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील टिळकवाडी परिसरात शाह कुटुंब वास्तव्यास आहे. शाह कुटुंबातील धाकट्या मुलाचा लग्न सोहळा अवघ्या 20 दिवसांवर आल्याने जोरदार तयारी सुरु होती. मात्र, त्यातच शाह दाम्पत्याने विष सेवन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे.
मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...
आपल्या मुलासोबत काल रात्री शाह दाम्पत्याने जेवण केले. यानंतर पती आणि पत्नीने विष सेवन केले. मुलाच्या लग्नाची तयारी घरात सुरू असताना आई-वडिलांनी आत्महत्या केल्याने शहा कुटुंबास मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अवघ्या वीस दिवसांवर धाकट्या मुलाचा लग्न सोहळा असतानाच आई-वडिलांनी आत्महत्या केल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात महिलेची आत्महत्या
दरम्यान, रविवारी नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एक महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. रुग्णालयाच्या आवारातील झाडाला गळफास घेत महिलेने स्वतःचे आयुष्य संपवलं. कविता अहीवळे असे महिलेचे नाव आहे. महिलेने गळफास घेतल्यानंतर रुग्णालयाच्या आवारात एकच खळबळ उडाली होती. यामुळे अनेक संशयास्पद घटनांच्या केंद्रस्थानी असणारे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय पुन्हा एकदा चाचेत आल्याचे दिसून आले.
इतर महत्त्वाच्या बातम्या