एक्स्प्लोर
Nanded Ratneshwari : गडावर वसलेली माता रत्नेश्वरी, हजारो भाविकांचे श्रद्धास्थान; नवरात्रोत्सवात दर्शनासाठी गर्दी
नांदेड : नांदेड-लातूर या राष्ट्रीय महमार्गावर जानापुरीपासून पूर्वेला 3 किमी अंतरावर वडेपुरी शिवारात उंच टेकडीवर रत्नेश्वरी देवीचे मंदिर आहे.

Nanded Ratneshwari Devi Navratri Celebration
1/13

दरवर्षी नवरात्र उत्सव काळात या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
2/13

लोहा तालुक्यातील वडेपुरी येथील गडावर यादवांच्या कालखंडात श्री रत्नेश्वरी देवी मातेच्या मंदिराची उभारणी झाली.
3/13

मंदिराच्या उभारणीनंतर हा गड 'रत्नेश्वरी गड' या नावाने ओळखला जाऊ लागला.
4/13

हेमाडपंथी बांधकाम, अनेक अख्यायिकांचे दिले जाणारे दाखले आणि भाविकांची श्रद्धा यामुळे रत्नेश्वरी देवी मंदिराचे वेगळेपण अधोरेखित होते.
5/13

या मंदिराबाबतची अख्यायिका सांगितली जाते की, नारायण माळी आणि लक्ष्मीबाई यांची रत्नाही तेजस्वी कन्या. लहानपणापासून तिने समाजकल्याण केलं.
6/13

यादवांचा किल्ला बांधणाऱ्या कारागिरांकडून रत्नाने महादेवाची पिंड तयार करुन घेतली. श्रावण महिन्यात दररोज पूजेसाठी येथे येण्याचा संकल्प तिने केला.
7/13

यादवांचा सरदार शंभुनाथ माळी यांच्यासोबत रत्नाचा विवाह झाला. विवाहानंतर भल्या पहाटे रत्ना महादेवाच्या पूजेसाठी येत असताना शंभुनाथ यांनी तिचा पाठलाग केला
8/13

याच ठिकाणी रत्नाचे शिळेत रुपांतर झाले. पुढे याच ठिकाणी रत्नादेवीचे मंदिर उभारण्यात आले. अशी अख्यायिका सांगितली जाते.
9/13

रत्नेश्वरी देवी मंदिर परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
10/13

image 10
11/13

भाविक या ठिकाणी येऊन आपली मनोकामना व्यक्त करतात. त्यानंतर त्याची पूर्तता होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
12/13

यामुळे दूरहून अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात.
13/13

नवरात्र काळात येथे भाविकांची दर्शनासाठी रिघ लागते.
Published at : 17 Oct 2023 03:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
