एक्स्प्लोर
Nanded: गौराईला केळीच्या बागेचा देखावा ठरलाय आकर्षक; नांदेमधील कुटुंबियांकडून अनोखी सजावट, पाहा फोटो
Nanded: नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पार्डी इथल्या शेतकरी कुटुंबाने गौराईला केळीच्या बागेचा अनोखा देखावा तयार केलाय, त्याचे काही आकर्षक फोटो पाहूया.

Gaurai Banana Decoration
1/13

पार्डी गावातील दिगंबर भांगे पाटील यांच्या कुटुंबाने सजीव देखावा तयार केला आहे.
2/13

प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर टाळत पाना-फुलांनी केलेल्या देखाव्याची गावात एकच चर्चा आहे.
3/13

पाटील कुटुंबाने गौराईचा साजश्रृंगार देखील केला आहे.
4/13

केळीच्या बागेत गौराई विराजमान झाल्यासारखं हे दृश्य गावात आकर्षणाचा विषय बनलंय.
5/13

हा देखावा पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली आहे.
6/13

गौराईच्या मध्ये विठु रखुमाईची आकर्षक मुर्ती देखील ठेवण्यात आली आहे.
7/13

साजशृंगार करून पाटील कुटुंबाने गौराईची स्थापना केली.
8/13

दुसऱ्या दिवशी गौरी पूजन करुन देवीला पंचपक्वान्न तयार करण्यात आलं. केळीच्या पानावर सर्व पदार्थ ठेवण्यात आले होते.
9/13

नैवेद्याच्या पंचपक्वानात मोदक, पुरणपोळी, अळुची भाजी, उडीद-मुगाचे वडे, कोशिंबीर, चटण्या, खीर, भजी, कढी, आंबील, पंचामृत, कटाची आमटी, लोणचे, लाडू, करंज्या, कुरडया, भात-वरण अशा विविध पदार्थांचा महानैवेद्य दाखवला गेला.
10/13

यासोबत दिव्यांची आरास देखील करण्यात आली होती.
11/13

गौराईंना घातलेला हा हिरवा गालिचा खरंच मन प्रसन्न करुन टाकणारा होता.
12/13

एन्ट्रीच्या वेळीही केळीच्या पानांनी बनवलेली कमान लावण्यात आली होती.
13/13

महालक्ष्मी देवीची पूजा करुन गौराई पूजनाचा संपूर्ण विधी पार पडला.
Published at : 23 Sep 2023 10:33 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion