एक्स्प्लोर
Health Tips : आंबट-गोड किवी फळात आहे आरोग्याचा खजिना; पाहा फायदे
Health Tips : दररोज एक किवी खाल्ल्याने अनेक फायदे मिळू शकतात. डोळ्यांसाठीही हे एक अत्यंत महत्त्वाचे फळ मानले जाते.

kiwi
1/8

किवी हे असेच एक फळ आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय किवीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सही आढळतात.
2/8

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच शरीराला अनेक आजारांशी लढण्याची ताकद देते. हे रोज खाल्ल्याने अस्थमा सारख्या आजारांपासून बऱ्याच अंशी आराम मिळतो.
3/8

व्हिटॅमिन ई आणि पोटॅशियम देखील किवीमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. हे रक्तवाहिन्यांना निरोगी ठेवते आणि तुमचे हृदय मजबूत करते. याशिवाय व्हिटॅमिन ई देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे
4/8

किवी हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप चांगले मानले जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या फळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
5/8

किवी खाल्ल्याने सेरोटोनिन वाढवणारी रसायने सक्रिय होतात, ज्यामुळे रात्री चांगली झोप लागते. मधुमेहाच्या रुग्णाने दररोज किवीचे सेवन करावे.
6/8

किवी हा आरोग्याचा खजिना मानला जातो. या फळामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आढळतात. ल्युटीन प्रमाणेच झेक्सॅन्थिन, फायटोकेमिकल्स असतात. ते शरीरात लोहाचे शोषण वाढवण्यास मदत करतात.
7/8

अॅनिमियाची समस्या असलेल्या लोकांना याचा फायदा होतो. दररोज एक किवी खाल्ल्याने अनेक फायदे मिळू शकतात. डोळ्यांसाठीही हे एक अत्यंत महत्त्वाचे फळ मानले जाते.
8/8

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 05 Mar 2023 09:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
