एक्स्प्लोर
Health Tips: निवांत चालणं टाळा, वेगात चाला; टाईप 2 डायबिटीजचा धोका होतो कमी
टाईप 2 मधुमेहाचा जागतिक प्रसार 2045 पर्यंत 537 दशलक्षावरून 783 दशलक्षापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. आरोग्याच्या समस्यांचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी वेगानं चालणं फायदेशीर ठरतं.

Health Research
1/9

'ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसीन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, चार किंवा त्याहून अधिक किलोमीटर प्रति तास वेगानं चालल्यामुळे टाईप 2 डायबिटीजचा धोका कमी होतो.
2/9

'ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसीन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, जर तुम्हाला 'टाईप 2 डायबिटीज'चा धोका कमी करायचा असेल तर दररोज ताशी चार किंवा त्याहून अधिक किलोमीटर वेगानं चालावं. या संशोधनात अमेरिका, जपान आणि ब्रिटनमधील 508,121 प्रौढांचा समावेश करण्यात आला होता.
3/9

संशोधनानुसार, चालण्याचा वेग जितका जास्त तितका टाईप 2 डायबिटीजचा धोका कमी. संशोधनाच्या निष्कर्षांवरून असं दिसून आलं आहे की, सरासरी 3 ते 5 किलोमीटर प्रति तास चालल्यास टाईप 2 डायबिटीजचा धोका 15 टक्क्यांनी कमी आहे. शिवाय, 4 किमी/तास मर्यादेपेक्षा प्रत्येक 1 किमी/ताशी वेग वाढल्यास, रोग विकसित होण्याच्या जोखमीमध्ये लक्षणीय 9 टक्क्यांची घट होते.
4/9

संशोधनाचे प्रमुख संशोधक म्हणतात की, वेगानं चालण्याचं अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत. शारीरिक हालचाली किंवा दररोज चालण्यात घालवलेल्या वेळेपेक्षा वेगानं चालल्याचे फायदे दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरतात. संशोधनानुसार, जोखीम कमी करण्यासाठी किमान वेग 4 किमी/तास होता, जो पुरुषांसाठी 87 पावलं/मिनिट आणि महिलांसाठी 100 पावले/मिनिट इतका आहे.
5/9

टाईप 2 मधुमेहाचा जागतिक प्रसार 2045 पर्यंत 537 दशलक्षावरून 783 दशलक्षापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. इराणमधील सेमनान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या संशोधकांनी सुचवलं आहे की, वेगानं चालणं यासारख्या साध्या आणि किफायतशीर शारीरिक हालचालींचा अवलंब करणं शक्य आहे.
6/9

आरोग्याच्या समस्यांचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी वेगानं चालणं फायदेशीर ठरतं.
7/9

संशोधनात नमूद केल्यानुसार, हा दृष्टीकोन केवळ मधुमेह दूर ठेवण्यासाठी मदत करत नाही तर अनेक सामाजिक, मानसिक आणि शारीरिक फायदे देखील यामुळे होतात.
8/9

टाईप 2 मधुमेह ही सध्याची वाढती समस्या आहे. टाईप 2 मधुमेहाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी एक उत्तम, आरोग्यदायी आणि अगदी सोपी रणनीती म्हणून वेगानं चालण्याच्या क्षमतेवर या संशोधनात प्रकाश टाकण्यात आला आहे.
9/9

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 13 Dec 2023 06:21 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
