एक्स्प्लोर
बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना रनौत पुन्हा चर्चेत; पाहा फोटो!

(photo: kanganaranaut/ig)
1/7

Kangana Ranaut : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आजकाल तिच्या 'लॉक अप' शोचा बोलबाला आहे. (photo: kanganaranaut/ig)
2/7

दरम्यान, कंगनाने तिची हेअरस्टाईल बदलली आहे, ज्यामध्ये तिला एका नजरेत ओळखणे देखील कठीण झाले आहे. त्याच वेळी, काही लोकांनी कंगनाला सोशल मीडियावर तिच्या या लूकबद्दल प्रचंड ट्रोल केले आहे. याचवेळी सुरक्षेत तैनात असणाऱ्या जवानाला उद्धट बोल लगावल्याने देखील तिला नेटकरी सुनावत आहेत. (photo: kanganaranaut/ig)
3/7

कंगना रनौतचा व्हिडीओ हा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. कंगना रनौत मंगळवारी मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. (photo: kanganaranaut/ig)
4/7

यादरम्यान तिचा लूक पूर्वीपेक्षा खूपच वेगळा दिसत होता. तिचे केस पूर्वीपेक्षा खूपच लहान दिसत होते. एअरपोर्टवर कंगना फ्लोरल ड्रेसमध्ये दिसली, पण काही लोकांनी तिच्या लूकची तुलना आमिर खानची माजी पत्नी किरण रावशी करायला सुरुवात केली. (photo: kanganaranaut/ig)
5/7

कंगना रनौतचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये कंगना प्रचंड ट्रोल होत आहे. (photo: kanganaranaut/ig)
6/7

वास्तविक यावेळी तिने सुरक्षेत तैनात असलेल्या जवानाला ‘आप रेहने दो..’ असे उद्धटपणे म्हटले. यावर आता युझर्स कंगनाला बोल लगावत आहेत. एका युझरने लिहिले की, ‘हिला सुरक्षा का देण्यात आली आहे. तिने देशासाठी काय केले?’ दुसर्याने लिहिले की, ‘माझ्या कराचा पैसा हिच्या सुरक्षेत गुंतवला जात आहे.’ (photo: kanganaranaut/ig)
7/7

कंगना रनौतच्या हेअरस्टाइलबद्दलही काही लोकांनी तिला ट्रोल केले आहे. एका यूजरने लिहिले, ‘आता हिने किरण रावची कॉपी करायला सुरुवात केली का?’ आणखी एका युझरने कमेंट केली की, ‘पुढचं टार्गेट आमिर खान.’ आणखी एकाने लिहिले की, ‘कंगना आमिरच्या एक्स पत्नीसारखी दिसतेय.’ (photo: kanganaranaut/ig)
Published at : 02 Mar 2022 11:35 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
