Santosh Deshmukh Case: सुरेश धस-धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर चक्रं फिरली, संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या चार्जशीटमध्ये फेरफार, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
Manoj Jarange Patil: आता जे गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या समोर मराठा आरक्षणावरून सरकार नवं आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याचं मनोज जरांगे म्हणाले.

बीड: भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात झालेल्या गुप्त भेटीनंतर संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या चार्जशीटमध्ये फेरफार होण्याची शक्यता आहे, असा संशय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केला. भाजपकडून सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना भेटण्यासाठी दबाव आणण्यात आला. धनंजय मुंडे यांची भेट घेण्यापूर्वी सुरेश धस यांनी भाजपकडून येणाऱ्या दबावाबाबत सांगायला हवे होते. तसे केले असते तर मराठा समाजाने सुरेश धस यांना डोक्यावर घेतले असते. पुढच्या निवडणुकीत एक लाख 67 हजार मतांनी सुरेश धस यांना मराठ्यांनी निवडून आणले असते. परंतु, सुरेश धस यांनी परस्पर धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने मराठा समाजाचा सुरेश धस यांच्यावरील विश्वास उडाला आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीत काहीतरी मोठी डील झाल्याचा दावा केला. डील झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगाने पुढे गेले किंवा ज्या वेगाने त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले, ज्या पद्धतीने त्यांनी काही कागद आणि पुरावे पुढे आणले, त्या सगळ्याला अचानक ब्रेक लागला आहे. चंद्रशेखर बावनकुळे त्यांचे बॉस आहेत, असे ते म्हणतात. देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्या बॉसचे बॉस आहेत, मग सुरेश धस यांच्या बॉसनेच त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का?, असा संशय संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरेश धस यांनी नकार दिला. तर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. सुरेश धस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची काय भेट झाली, काय संवाद झाला याबाबत मला माहित नाही. सध्या मी मुंबईतही फार जात नाही आणि इतक्यात कोर टीमची देखील बैठक झालेली नाही. त्यामुळे यावर जास्त प्रकाश तेच टाकू शकतात, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.
मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन, मनोज जरांगेंचा दावा
राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी एक रणनीती आखल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. दोन मंत्र्यांना सोबत घेत सरकार नवे मराठा आरक्षण आंदोलन उभं करण्याच्या तयारीत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन मंत्र्यांची आंदोलनाबाबत चर्चा झाली आहे. दोन मंत्री अगोदर आरक्षणासाठी अन्नत्याग आंदोलन करणार , त्यानंतर आरक्षण आंदोलन उभे राहील. आरक्षण आंदोलनासाठी ज्या मंत्र्यांसोबत चर्चा केली त्यांनीच ही माहिती दिल्याचा गौप्यस्फोट मनोज जरांगे पाटील यांनी केला. ते बुधवारी शिवजयंती उत्सवासाठी धाराशिवमध्ये आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

