एक्स्प्लोर
अवकाळी पावसाचा तडाखा, भंडारा आणि अकोला जिल्ह्यातील शेती पिकांचं नुकसान
अवकाळी पावसामुळं शेती पिकांना फटका बसत आहे. भंडारा आणि अकोला जिल्ह्यातील शेती पिकांचं नुकसान झालं आहे.
Rain news
1/10

राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावलीय. याचा मोठा फटका शेती पिकांना बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
2/10

राज्यातील भंडारा (bhandara) आणि अकोला (akola) जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे या पावसामुळं मोठे नुकसान झालंय.
3/10

पपईसह केळीच्या बागा (Damage to papaya and banana) भुईसपाट झाल्या आहेत.
4/10

भंडारा जिल्ह्यातील मागील तीन दिवसात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरु आहे. या अवकाळी पावसाचा फटका भातपिकांसह पालेभाजी पिकांनाही बसला आहे.
5/10

अवकाळी पावसानं भात पिकांसह मिरची आणि पालेभाज्याची पिकं जमिनदोस्त झाली आहेत.
6/10

अनेक शेतातील मिरची पीक जळून खाली पडल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे.
7/10

अकोला जिल्ह्यात झालेल्या वादळाने हिवरखेडसह झरी बाजार, दिवाणझरी, चिचारी, चंदनपुर नया खेडा, उंबर शेवडी, कार्ला यासह अनेक गावांना फटका बसलाय
8/10

शेकडो एकरावरील पपई व केळीच्या फळबागा भुईसपाट झाल्या आहेत. काल अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात वादळाची तीव्रता इतकी होती की मोठमोठे अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत.
9/10

संत्रा, आंबा, केळी, पपई, ज्वारी, कांदा, भुईमूग, ज्वारी, अशा कित्येक फळे, भाजीपाला धान्य आणि विविध पिकांचे नुकसान झाले आहे.
10/10

16 मे पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Published at : 11 May 2024 02:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
आयपीएल
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion