Nagpur Violance : नागपूर हिंसाचाराच्या घटनेला आठवडा पूर्ण! प्रभावित क्षेत्रात संचारबंदी जैसे थे; पोलिस आयुक्तांचे नवे निर्देश काय?
Nagpur Violance Update : नागपुरातील हिंसाचाराच्या घटनेला आज (23 मार्च) सात दिवस पूर्ण झाले आहे. तरीही आज सातव्या दिवशी नागपूरच्या चार पोलीस ठाणे हद्दीत संचाबंदी कायम आहे.

Nagpur Violance Update : नागपुरातील हिंसाचाराच्या घटनेला आज (23 मार्च) सात दिवस पूर्ण झाले आहे. राज्याच्या उपराजधानीत कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात दोन गटात दंगल उसळली. औरंगजेबच्या कबर प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चानंतर गेल्या सोमवारी सायंकाळी दोन गटात तुफान दगडफेक जाळपोळ आणि हिंसाचार झाल्याची घटना घडली. नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत (Nagpur Violence) अनेकांचे मोठे नुकसान ही झाले. या हिंसाचाराची दाहकता अजूनही पीडित नागरिकांना भयभीत करणारी ठरते आहे.
दुसरीकडे, नागपुरातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी घटनेवर पूर्णत: नियंत्रण मिळवत टप्प्या-टप्प्यात आता शहर पूर्ववत होतंय. मात्र ज्या भगत हिंसाचाराची घटना घडली त्या प्रभावित क्षेत्रात सातव्या दिवशीही संचारबंदी 'जैसे थे' च असल्याचे चित्र आहे. परिस्थितीचा आढावा घेऊनच पोलीस प्रशासन आता सावध पवित्रा घेत असल्याचे बघायला मिळते आहे.
पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी उठवली
नागपूर शहरात आज सातव्या दिवशी नागपूरच्या चार पोलीस ठाणे हद्दीत संचाबंदी कायम आहे. यात शहरातील गणेशपेठ, तहसील, कोतवाली आणि यशोधरानगर या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम असून सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. रात्री 10नंतर या हद्दीत संचार बंदी कायम असणार आहे. दोन पोलीस ठाणे हद्दीतील संचारबंदी आधीच हटवली आहे. त्यानंतर आता नागपूरातील पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटविण्यात आली आहे. पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचार बंदी पूर्णतः हटविण्यात आली. तर संचारबंदी भागात बाजारपेठा , सर्व सरकारी खाजगी आस्थापने पूर्णतः बंद असणार आहे. असे आदेश नागपूर पोलीस आयुक्तांनी काढले आहेत.
104 दंगलखोरांची ओळख पटली, अद्दल घडवल्याशिवाय सोडणार नाही- मुख्यमंत्री
नागपुरातील हिंसाचाराच्या प्रकरणात आतापर्यंत 104 दंगलखोरांची ओळख पटली आहे. त्यापैकी 92 जणांना अटक केली आहे. तर 12 जण अल्पवयीन असल्याने त्यांच्यावरही विधिसंघर्षित कायद्यानुसार कारवाई सुरु आहे. संपूर्ण प्रकरणात आम्ही बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र हिंसाचार करणाऱ्या कुणालाही या प्रकरणातून सोडले जाणार नाही. पोलिसांवर हल्ला करणे हे अतिशय गंभीर बाब असून अशा हल्लेखोरांना जर सोडलं तर हे कायदा आणि सुव्यवस्था या दृष्टीने योग्य नाही. परिणामी त्यांना अद्दल घडवल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

