एक्स्प्लोर
Onion Export Duty: कांद्यावरील 20% निर्यातशुल्क रद्द करा लासलगावात 'शोले स्टाईल' आंदोलन, शेतकरी आक्रमक, लिलाव बंद
शेतकरी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत.
Lasalgaon Auction stops
1/8

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात घसरण सुरू आहे. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करा या मागणीसाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले आहेत.
2/8

बाजार समितीतील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पडले असून लासलगाव बाजार समितीतील पाण्याच्या टाकीवर चढवून शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे
3/8

शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली असून या आंदोलनात कांदा उत्पादक संघटना, प्रहार शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत.
4/8

राज्याच्या अर्थसंकल्पाला सुरुवात होण्यापूर्वीच संतप्त शेतकऱ्यांशी आमदार छगन भुजबळांनी संवाद साधला आहे.
5/8

कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द व्हावे म्हणून विधानसभेत कांद्याचा प्रश्न तातडीने मांडणार असल्याचं आश्वासन भुजबळांनी शेतकऱ्यांना दिलं आहे.
6/8

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही आंदोलन शेतकऱ्यांशी संवाद साधला असून केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी तातडीने पत्रव्यवहार करत निर्यात शुल्क रद्द करण्यासंबंधी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
7/8

कांद्यावरील 20% निर्यात शुल्कर रद्द करावे, नाफेड ने कांदा खरेदी बाजार समितीत येऊन करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
8/8

शेतकरी अजूनही आंदोलनावर ठाम असून देशातील प्रमुख बाजार समिती असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पडले आहेत.
Published at : 10 Mar 2025 11:16 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
मुंबई
क्रिकेट


















