Suresh Dhas : कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून सुरेश धस पुन्हा आक्रमक; कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी घेतलेल्या निर्णयाची मागीतली माहिती
Suresh Dhas on Dhananjay Munde : एकीकडे धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानं विरोधकांच्या निशाण्यावर असलेले भाजप आमदार सुरेश धस पुन्हा आक्रमक झाले आहेत.

Suresh Dhas : एकीकडे धनंजय मुंडेंची (Dhananjay Munde) भेट घेतल्यानं विरोधकांच्या निशाण्यावर असलेले भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) पुन्हा आक्रमक झाले आहेत. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयाची माहिती सुरेश धस यांनी मागितलीय. कृषी विभागाच्या खरेदी प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार देखील त्यांनी केलीय. कृषी विभागाला पत्र पाठवून आमदार सुरेश धसांनी ही मागणी केलीय. तेल बियांच्या उत्पादकता वाढीसंदर्भातील निर्णयांची माहिती देण्याची मागणी या पत्राद्वारे सुरेश धसांनी केलीय. यात कापूस सोयाबीन तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठीच्या पत्र व्यवहाराची माहिती मागितली असल्याचे ही सांगण्यात येतंय. तर 2020 ते 2025 दरम्यानच्या काळात झालेल्या पत्रव्यवहारांची मागणी ही त्यांनी केलीय.
एकीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर (Santosh Deshmukh Murder Case) टीकेची झोड उठवणारे भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या, तर दुसरीकडे विरोधकांनी ही आमदार धस यांना लक्ष्य केले होते. अशातच कृषी विभागातील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून सुरेश धस पुन्हा आक्रमक झाल्याचे आता बघायला मिळाले आहे.
राजीनाम्यासाठी नैतिक दबाव?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महत्त्वाचं विधान केलंय. राजीनामा द्यायचा की नाही हे स्वत: धनंजय मुंडेंनी ठरवावं, असं मोठं विधान अजितदादांनी केलंय. तर सिंचन घोटाळ्यावेळी माझ्यावर देखील आरोप झालेत, त्यावेळी मी राजीनामा दिला होता असं अजित पवार म्हणालेत. पुरावा नसेल म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नसेल, असं उत्तर अजित पवारांनी दिलंय.
कृषी विभागातील 'त्या' निर्णयांची माहिती देण्याची केली पत्राद्वारे मागणी
आमदार सुरेश धस हे पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे तकालीन कृषिमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती द्या असं पत्र सुरेश धस यांनी कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना लिहिलय. या पत्रात अधिकाऱ्यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला गेलाय.यामधे खालील चार बाबींची प्रामुख्याने मागणी केली गेली आहे.
-तेलबियांच्या उत्पादकता वाढीसंदर्भातील निर्णयांची माहिती देखील या पत्राद्वारे मागवली आहे.
-2020 ते 2025 पर्यंतच्या पत्रव्यवहाराची माहिती मागण्यात आलीय.
- कापूस सोयाबीन तेलबियांचे उत्पादकता देण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती देण्याची मागणी.
-कृषी विभागाच्या खरेदीच्या प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा वेगवेगळ्या तक्रारी आल्याचे सुरेश धस यांनी म्हटलय.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

