एक्स्प्लोर

Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 

Parbhani Bribe Case : लाचखोर मुख्याध्यापिका सिद्धीकी अहेमदी यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्याकडे 9 लाख 75 हजार रुपये सापडले. 

परभणी: शहरातील मॉडेल उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका आणि लिपिकाला आपल्याच शाळेतील पर्यवेक्षकाकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या दोघांवरही शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्याध्यापिकेच्या घरी झडती घेतली असता 9 लाख 75 हजार रुपये सापडले आहेत. त्यामुळे परभणीच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात तक्रारकर्ता हा मॉडेल उर्दू हायस्कूलमधील पर्यवेक्षकच आहे. तो त्याचे काम करीत असताना तिथे शाळेतील लिपीक बुढण खान पठाण आला. तुम्हाला माहे एप्रिल ते सप्टेंबर 2024 या 6 महिन्यांचे प्रलंबित वेतन मिळाले आहे. त्या वेतनातून प्रती महिना 3 हजार असे 6 महिन्याचे एकूण 18 हजार रुपये मुख्याध्यापिका सिद्धीकी अहेमदी मॅडम यांनी मागितले असल्याचे त्याने सांगितले.

पर्यवेक्षकाने मुख्याध्यापिका सिद्धीकी अहेमदी यांची भेट घेतली असता त्यांनीही 6 महिन्याच्या वेतनातून 18 हजार रुपये आणून देण्याची मागणी केली. त्यानंतर पर्यवेक्षकानी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे या संबंधीची तक्रार दिल्यानंतर याची पडताळणी 18 मार्च रोजी करण्यात आली. बुधवारी सायंकाळी सापळा रचण्यात आला.

मुख्याध्यापिका सिद्धीकी अहेमदी यांनी शाळेतच संबंधित तक्रारकर्त्यास ती रक्कम लिपीक बुढण खान पठाण यांच्याकडे द्यावी, असे सांगितले. लिपीकाने संबंधित तक्रारकर्त्याकडून मुख्याध्यापिका सिद्धीकी अहेमदी यांच्या सांगण्यावरुन ती रक्कम स्विकारली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मुख्याध्यापिका आणि लिपीक या दोघांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले.

दरम्यान, मुख्याध्यापिका सिद्धीकी अहेमदी यांच्याकडून यावेळी पथकाने रोख रक्कम 9 हजार 840 रुपये व लिपीक बुढाण खान यांच्याकडून 5 हजार 190 रुपये व मोबाईल ताब्यात घेतले. पथकाने मुख्याध्यापिका सिद्धीकी अहेमदी यांच्या घरून झडतीतून 9 लाख 75 हजार रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली. या प्रकरणी दोघांवरही कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाच घेणाऱ्या न्यायाधीशाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

साताऱ्यातील लाच घेणाऱ्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. एका प्रकरणात आरोपीला जामीन देण्याकरता 5 लाखांची लाच घेतल्याचा न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान, सातारा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला न्यायाधीश महोदयांनी हायकोर्टात दिलेलं आव्हान याचिका आता फेटाळण्यात आलं आहे. 

न्यायाधीशांनी त्यांचे निकटवर्तीय खरात बंधूंमार्फत लाच मागितल्याची एसीबीकडे  तक्रार आली होती. न्यायाधीश निकम यांनी सारे आरोप फेटाळले असले तरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात निकमांचा यात सहभाग असल्याचे पुरावे हायकोर्टानं ग्राह्य धरले आहे. परिणामी या प्रकरणात  न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाने झटका दिला आहे. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Embed widget